New Parliament Inauguration LIVE Updates: आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन, विरोधकांचा मात्र उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार; जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
New Parliament Building Inauguration Live: आज देशाला नवी संसद मिळणार आहे. नव्या संसदेचा उद्घाटन सोहळा लवकरच सुरू होणार आहे. येथे मिळवा क्षणोक्षणीचे अपडेट्स...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या लोकसभेचे उद्घाटन केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष आणि इतर मंत्र्यांनी सेंट्रल हॉलमध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली.
भारताच्या नवीन संसद भवनात चाणक्य आणि अखंड भारताचे फोटो लावण्यात आले आहे.
New Parliament Building : नव्या संसदेचं उद्घाटन (New Parliament Building Inauguration) संपन्न आलं आहे. पण देशाच्या नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर बहिष्काराच्या बातम्या आहेतच, असं असलं तरी नव्या संसदेवरुन आणखी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरु आहेत. नव्या संसदेच्या वैशिष्ट्यांवरुनही चर्चा रंगल्या आहेत. जुन्या संसदेपेक्षा जास्त खासदार बसू शकतील अशा भविष्याच्या हेतूनेच ही नवी संसद तयार करण्यात आली आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, थोड्याच वेळात भाजपचे खासदार जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जमून वीर सावरकरांना आदरांजली वाहतील.
नवीन संसद भवनात आयोजित 'सर्व-धर्म' प्रार्थना समारंभात पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि कॅबिनेट मंत्री सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केलं. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते.
संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी संसद भवन परिसरात सर्वधर्मीय प्रार्थना केली जात आहे. सर्व धर्माचे धर्मगुरू आपापल्या श्रद्धेचे मंत्र म्हणत आहेत.
New Parliament Inauguration: पंतप्रधान मोदींनी उद्घाटनापूर्वी संसद भवन बांधणाऱ्या मजुरांचे आभार मानले, तसेच त्यांना सन्मानित केलं.
New Parliament Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात राजदंड स्थापित केला असून त्यांनी फलकाचे अनावरणही केलं आहे.
New Parliament Inauguration LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात सेंगोलची स्थापना केली, त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते.
New Parliament Inauguration: पीएम मोदींचं सेंगोलला साष्टांग दंडवत
New Parliament Inauguration: पंतप्रधान मोदी यांच्याकडे तामिळनाडू सेंगोल सोपवण्यात आला आहे, 18 मठांच्या मठाधिपतींनी मोदींना आशीर्वाद दिला आणि त्यांच्याकडे राजदंड सुपूर्द केला. राजदंड म्हणजे तुम्ही कोणावरही अन्याय करू शकत नाही.
New Parliament Inauguration LIVE: नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात हवन आणि पूजेने झाली.
New Parliament Inauguration: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवनात महात्मा गांधींना पुष्पहार अर्पण केला.
New Parliament Inauguration: संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी मंत्रोच्चारात देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन करत आहेत. त्यांच्यासोबत स्पीकर ओम बिर्ला बसले आहेत.
New Parliament Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 8.45 वाजता नवीन संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत.
New Parliament Inauguration: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनात छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही मोठी काळजी घेण्यात आली आहे. या बाबतीत सेंगोल लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ठेवल्यास सेंगोलच्या वरचा नंदी पूर्व-पश्चिम दिशेला असेल. सेंगोलची प्रतिष्ठापना केल्यानंतर दीपप्रज्वलन आणि सेंगोलच्या फुलांचे पूजन पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
New Parliament Inauguration LIVE: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासंदर्भात अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही संसद भवनात पोहोचले आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि इतर मुख्यमंत्री संसद भवन संकुलात पोहोचले आहेत.
New Parliament Inauguration: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शहा संसद भवनात पोहोचले असून उद्घाटन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत.
New Parliament Inauguration: या कार्यक्रमाला आमंत्रित अधिकारी आणि मंत्री संसद भवनाच्या कामकाजासाठी संसद भवनात पोहोचतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 7.15 वाजता संसद भवनात पोहोचतील.
New Parliament Inauguration: महिला महापंचायतीच्या घोषणेवरून जंतरमंतरवर कुस्तीपटूंचा विरोध असल्याने जंतरमंतरवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ कुस्तीपटूंनी संसदेच्या नवीन इमारतीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे.
New Parliament Inauguration: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. विरोधी पक्ष नेहमीच प्रजासत्ताक कमकुवत करत आले आहेत, एक वेळ अशी होती की राहुल गांधींनी अध्यादेश फाडून प्रजासत्ताक पद्धतीचा अवमान केला होता.
New Parliament Inauguration: नवीन संसदेच्या उद्घाटन समारंभासाठी, तामिळनाडूच्या विविध मठांचे अधिनाम नवीन संसद भवनाकडे रवाना झाले. यादरम्यान, तामिळनाडूच्या वेल्लाकुरुची अधानमचे 18 वे पुजारी म्हणाले, आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. स्पीकरच्या खुर्चीजवळ सेंगोल लावले जाईल. पंतप्रधानांनी काल सर्व पुरस्कारांचा गौरव केला होता.
New Parliament Building: खाप पंचायतीचे नेते आणि शेतकरी आज दिल्लीतील संसदेच्या नवीन इमारतीकडे मोर्चा काढणाऱ्या निदर्शक कुस्तीपटूंमध्ये सामील होऊ शकतात म्हणून पोलिसांनी टिकरी बॉर्डरवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
New Parliament Inauguration: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त कोणताही गडबड होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. राजधानी दिल्लीत प्रवेश करणाऱ्या सर्व सीमा आज पूर्णपणे सील करण्यात आल्या असून राजधानीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे.
New Parliament Inauguration LIVE: नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात 25 पक्षांचा समावेश, तर 21 पक्षांचा बहिष्कार
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनात देशातील एकूण 25 राजकीय पक्ष सहभागी होत आहेत, तर काँग्रेससह 21 राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
New Parliament Building Inauguration LIVE: नवीन संसदेच्या उद्घाटन समारंभाचा संपूर्ण कार्यक्रम
सकाळी 7.30 वाजता : हवन आणि पूजा
सकाळी 8.30 वाजता : सेंगोलची स्थापना
सकाळी 9.00 वाजता : प्रार्थना सभेचे आयोजन
दुपारी 12.07 वाजता : राष्ट्रगीत
दुपारी 12.10 वाजता : राज्यसभेच्या उपसभापतींचं भाषण
दुपारी 12.17 वाजता : 2 लघुपटांचे स्क्रीनिंग
दुपारी 12.29 वाजता : उपराष्ट्रपतींचं अभिभाषण वाचलं जाईल
दुपारी 12.33 वाजता : राष्ट्रपतींचा अभिभाषण वाचलं जाईल
दुपारी 12.38 वाजता : विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचं भाषण (बहिष्कारामुळे शक्यता कमी)
दुपारी 12.43 वाजता : स्पीकर ओम बिर्ला यांचा पत्ता
दुपारी 01.05 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 रुपयांचं नवं नाणं जारी करतील
दुपारी 1.10 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण
New Parliament Building Inauguration LIVE: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनानंतर आज आणखी एक ऐतिहासिक क्षण संपूर्ण देश याचि देहा याची डोळा पाहणार आहे. आज देशाला लोकशाहीचं नवं मंदिर मिळणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणाराय. आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशासह जगाचं लक्ष लागलंय. सेन्ट्रल व्हिस्टा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि याच सेन्ट्रल व्हिस्टामध्ये संसद भवन आहे. अगदी कोरोना काळातही सेंट्रल व्हिस्टाचं काम सुरू होतं. अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं आज उद्घाटन होतंय. या उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपकडून वतीने जय्यत तयारी करण्यात आलीय.
पार्श्वभूमी
New Parliament Building Inauguration Live: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनानंतर आज आणखी एक ऐतिहासिक क्षण संपूर्ण देश याचि देहा याची डोळा पाहणार आहे. आज देशाला लोकशाहीचं नवं मंदिर मिळणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणाराय. आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशासह जगाचं लक्ष लागलंय. सेन्ट्रल व्हिस्टा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि याच सेन्ट्रल व्हिस्टामध्ये संसद भवन आहे. अगदी कोरोना काळातही सेंट्रल व्हिस्टाचं काम सुरू होतं. अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं आज उद्घाटन होतंय. या उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपकडून वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
नव्या संसदेचं उद्घाटन (New Parliament Building Inauguration) अवघ्या काही तासांवर आलं आहे. पण देशाच्या नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर बहिष्काराच्या बातम्या आहेतच, असं असलं तरी नव्या संसदेवरुन आणखी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरु आहेत. नव्या संसदेच्या वैशिष्ट्यांवरुनही चर्चा रंगल्या आहेत. जुन्या संसदेपेक्षा जास्त खासदार बसू शकतील अशा भविष्याच्या हेतूनेच ही नवी संसद तयार करण्यात आली आहे.
संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होतं आणि त्यात एका गोष्टीचीही जोरदार चर्चा आहे नव्या संसदेत वाढलेल्या जागांची. जुन्या संसदेत लोकसभेत 543 खासदार बसू शकत होते, तर नव्या संसदेत 888 खासदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तर राज्यसभेत सध्याची 250ची क्षमता वाढवून 384 करण्यात आली आहे. नवी इमारत बांधताना साहजिकच भविष्यातल्या गरजांचा विचार करुनच ती बांधण्यात आली आहे. त्यामुळे त्यात खासदारांची भविष्यात वाढू शकणारी संख्याही गृहीत धरली आहे. अशीच नव्या संसद भवनाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जाणून घेऊया नव्या संसद भवनाबाबतच्या काही खास गोष्टी सविस्तर...
नवीन संसद भवन कुणी बांधलं?
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला नव्या संसद भवनाची इमारत बांधण्याचं कंत्राट मिळालं होतं. त्यांनी सप्टेंबर 2020 मध्ये 861.90 कोटी रुपयांची बोली लावून हा करार जिंकला होता. नवं संसद भवन सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पाची ब्लू प्रिंट गुजरातमधील एचसीपी डिझाईन या आर्किटेक्चर फर्मनं तयार केली आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागानं (CPWD) गेल्या संसद, कॉमन सेंट्रल सेक्रेटरियट आणि सेंट्रल व्हिस्टाच्या विकासासाठी सल्लागार म्हणून एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटला ऑक्टोबर 2019 मध्ये नेमलं होतं.
सेंट्रल व्हिस्टा क्षेत्राचा मास्टर प्लॅन आणि नवीन गरजांनुसार इमारतींचे डिझाईन तयार करण्यात या कंपनीचा सहभाग आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची निविदा सीपीडब्ल्यूडीनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काढली होती. सल्लागारांसाठी 229.75 कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला होता. एचसीपी डिझाइननं ही बोली जिंकली. एचसीपी डिझाईनला गुजरातमधील गांधीनगरमधील सेंट्रल व्हिस्टा आणि राज्य सचिवालय, अहमदाबादमधील साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, मुंबई पोर्ट कॉम्प्लेक्स, वाराणसीमधील मंदिर कॉम्प्लेक्सचा पुनर्विकास, आयआयएम अहमदाबादच्या न्यू कॅम्पस डेव्हलपमेंटसारख्या प्रकल्पांचा पूर्वीचा अनुभव आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -