Income Tax Portal Issue: भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने देशातील मोठी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे (Infosys) एमडी आणि सीईओ सलील पारेख (Salil Parekh) यांना समन्स जारी केले आहेत. इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना 23 ऑगस्ट 2021 रोजी नवीन ई-फाइलिंग पोर्टल (E-filing portal) लाँच झाल्यानंतर 2.5 महिन्यांनंतरही त्यासंबंधीच्या अडचणी अजून दूर का झाल्या नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. 21 ऑगस्ट 2021 पासून प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी प्राप्तिकराचे नवीन ई-फाइलिंग पोर्टल उपलब्ध नाही.






आयकर विभागाच्या नवीन ई फायलिंग पोर्टलमध्ये अनेक समस्या येत आहेत. आयकर रिटर्न्स भरणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की ते करदात्यांची समस्या समजून घेतात. आयकर विभागाच्या या ई फाईलिंग पोर्टलचे काम सुरळीत होत नसल्यामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे.


प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाची प्रक्रिया सुलभ, सोपी आणि गतिमान व्हावी या उद्देशाने 7 जून रोजी ई-फायलिंग वेबसाईट सुरु केली. मात्र, ही वेबसाईट करदात्यांसाठी त्रासदायकच ठरल्याची अनुभूती येत आहे. करदात्यांवर ई-फायलिंग करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जून महिन्यात अनेक तक्रारी आल्यानंतर थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. 


मात्र, ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील अनेक अडचणींचा सामना विवरण पत्र भरताना येत आहे. आधी लॉगिन होत नव्हते, आता लॉगिन होत आहे, मात्र फार्म भरण्याची प्रक्रिया किचकट आणि क्लिष्ट झाल्याचं तज्ञ सांगतात.