नवी दिल्ली : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या अद्याप कमी येण्याची चिन्ह दिसत नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात कोरोनाच्या 30 हजार 948 रुग्णांची भर पडली तर 403 जणांचा मृत्यू झाला. काल एकाच दिवशी 38 हजार 487 रुग्ण कोरोनामुक्त झाले. शुक्रवारी देशात 34 हजार 457 रुग्णांची नोंद झाली होती तर 375 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


देशातील सध्याची कोरोनास्थिती : 



  • कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 24 लाख 24 हजार 234

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 16 लाख 36 हजार 469

  • सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 53 हजार 398 

  • एकूण मृत्यू : चार लाख 34 हजार 367


देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 58 कोटी 14 लाख 89 हजार 377 डोस देण्यात आले असून काल एकाच दिवसात 52 लाख 23 हजार 612 लोकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.


राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ  लागली आहे. गेल्या 24 तासात 4,575 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 914 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 27 हजार 219 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.99 टक्के आहे. 


राज्यात शनिवारी 145 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 33 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  53 हजार 967 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  जळगाव (42), नंदूरबार (0),  धुळे (8), परभणी (16), हिंगोली (77),   नांदेड (41), अमरावती (93), अकोला (17), वाशिम (5),  बुलढाणा (42), यवतमाळ (11), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (3),  गडचिरोली (21) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 558 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


महत्वाच्या बातम्या :