एक्स्प्लोर

एसपीजीच्या परवानगीविना मंत्री, खासदारांनाही मोदींच्या जवळ जाता येणार नाही

सार्वजनिक मंचावर एसपीजीच्या परवानगीशिवाय पंतप्रधान मोदींच्या आसपास कोणाही मंत्र्याला, खासदाराला किंवा आमदाराला जाऊ देऊ नये, असा आदेश गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांतील डीजीपी आणि एसपीजी यांना देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने स्पेशल प्रोटेक्शन गृप (एसपीजी) आणि सर्व राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. सार्वजनिक मंचावर एसपीजीच्या परवानगीशिवाय पंतप्रधान मोदींच्या आसपास कोणाही मंत्र्याला, खासदाराला किंवा आमदाराला जाऊ देऊ नये, असा आदेश गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांतील डीजीपी आणि एसपीजी यांना देण्यात आला आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं की, “पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली आहे. 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी नरेंद्र मोदी हे स्टार प्रचारक असतील, त्यामुळे प्रचारादरम्यान होणाऱ्या सभांवेळी मोदींसोबत इतर स्थानिक नेतेही मंचावर असतील. अशावेळी मोदींची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणं गरजेचं आहे.” नक्षलवाद्यांनी नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर एसपीजीने नरेंद्र मोदी आणि एसपीजी सुरक्षा असणाऱ्या अन्य नेत्यांच्या सुरक्षेची तपासणी केली. सुरक्षेबाबतची परवानगी असल्याशिवाय रोड शो केला जाऊ नये, असं एसपीजीकडून नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सांगितलं जाणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गुप्तचर यंत्रणांच्या सूचनेनंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, गृहसचिव राजीव गौबा, गुप्तचर विभागाचे प्रमुख तसंच एसपीजी प्रमुख यांची एक बैठक घेतली होती. त्यानंतरच सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यावर काम सुरु झालं होतं. ज्याच्या अंबलबजावणीसाठी आता गृहमंत्रालयाने राज्यांना सूचना दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget