एक्स्प्लोर

सरकारकडून NPRचा नवा फॉर्म जारी; 7 नव्या घटकांचा समावेश

सरकारने एनपीआरचा नवा फॉर्म तयार केला आबे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनपीआरच्या नवीन डेटाबेसमध्ये आधार नंबर, पॅन नंबर, वोटर आयडी नंबरसह जवळपास 7 नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : सरकारने एनपीआरचा नवा फॉर्म तयार केला आबे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनपीआरच्या नवीन डेटाबेसमध्ये आधार नंबर, पॅन नंबर, वोटर आयडी नंबरसह जवळपास 7 नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. एनपीआर अंतर्गत कोणतेही ओळखपत्र दिले जाणार नाही. तसेच कोणतीही बायोमेट्रिकही करण्यात येणार नाही. गृह मंत्रालयाने याबाबत अंतिम रूपरेषा तयार केली आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हा देशातील सामान्य रहिवाश्यांचा एक विस्तृत डेटाबेस आहे. हे नागरिकत्व कायदा 1955 च्या तरतुदींनुसार तयार करण्यात आलं असून नागरिकत्व (नागरिकांची नोंदणी आणि राष्ट्रीय ओळखपत्र देणे) नियमावली, 2003 मध्ये समाविष्ट असलेल्या प्रक्रियेद्वारे तयार केले जात आहे. एनपीआर अंतर्गत ओळखपत्र दिले जाणार नाही. एनपीआर 2010मध्ये जी माहिती देण्यात आली होती त्यामध्ये या माहितीचा समावेश होता... 1. व्यक्तीचं नाव 2. मुख्य व्यक्तीशी संबंध 3. वडिलांचं नाव 4. आईचं नाव 5. पति/पत्नीचं नाव (विवाहित असाल तर) 6. लिंग 7. जन्म तारिख 8. वैवाहित स्थिती 9. जन्म ठिकाण 10. राष्ट्रीयत्व 11. वर्तमान निवासी पत्ता 12. वर्तमान निवासी पत्ता कधीपासून राहत आहात 13. स्थायी निवासी पत्ता 14. व्यवसाय/क्रियाकल्प 15. शिक्षण 16. युआयडीएआयच्या माध्यमातून नक्कल रोखण्यासाठी आणि आधार क्रमांक तयार करण्याच्या उद्देशाने ओआरजीआयला 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना देण्यात आलेल्या तीन बायोमेट्रिक फोटो, 10 फिंगरप्रिंट्स आणि 02 आयरिस देखील संग्रहित करण्यात आल्या होत्या. एनपीआर 2020 मध्ये बरेच अतिरिक्त गुण समाविष्ट केले जाऊ शकतात. एनपीआर 2020मध्ये या घटकांचा केला जाऊ शकतो समावेश 1. आधार नंबर 2. मोबाइल नंबर 3. पॅन नंबर 4. वोटर आयडी नंबर 5. ड्राइविंग लायसन्स 6. पासपोर्ट नंबर (केवल भारतीय पासपोर्ट) 7. मागील निवास स्थान, आई-वडिलांचं जन्म स्थान आणि जन्म तारिख एनपीआरला 2010मध्ये पहिल्यांदा तयार करण्यात आलं होतं. यानंतर जन्म, मृत्यू आणि प्रवासामुळे जर इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं असेल तर हे पुन्हा अपग्रेड करण्याची गरज आहे. 2015मध्ये यातील काही घटकांचा समावेश करण्यात आला होता. एनपीआरच्या आकड्यांच्या आधारे सामान्य माणसाला अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो. जसं आयुष्मान भारत, जन धन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, लोक वितरण प्रणाली (PDS) इत्यादी योजनांचा समावेश आहे. एनपीआरमध्ये माहिती भरण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक घरी एक सरकारी कर्मचारी पाठवण्यात येईल. कारण सर्व व्यक्ती स्वतःहून आपली माहिती अपडेट करू शकणार नाही. याव्यतिरिक्त घर-घर गणना स्वतःच हे निश्चित करणार की, यामध्ये पूर्ण सर्व लोकांना समाविष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच, सरकार सर्व गोष्टींची खबरदारी घेणार आहे. याबाबत सरकारने स्पष्ट केलं आहे की, एनपीआर अपडेट करताना कोणतीही कागदपत्र एकत्र करण्यात येणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Yusuf Pathan NCPI: 'आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही', युसूफ पठाणसह NCP च्या तीन खासदारांची एनडीएच्या बैठकीकडे पाठ; एनसीपीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
'आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही', युसूफ पठाणसह NCP च्या तीन खासदारांची एनडीएच्या बैठकीकडे पाठ; एनसीपीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Embed widget