New Delhi : भारतात प्लास्टिकचा (Plastic) वाढता वापर लक्षात घेता प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत नुकतंच एक सर्वेक्षण (Survey) करण्यात आलं. या सर्वेक्षणात भारतातून तब्बल 8 लाखांहून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला. त्यापैकी 80 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की, प्लास्टिकच्या पिशव्या पूर्णपणे कागदी पिशव्यांनी बदलल्या पाहिजेत. यातून पर्यावरणाविषयीची वाढती जागरूकता दिसून येते. जागतिक कागदी पिशवी दिनानिमित्त (Paper Bag Day), न्यूज एग्रीगेटर इनशॉर्ट्सने हे सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात प्लॅस्टिक पिशव्यांचा पर्याय म्हणून कागदी पिशव्यांचा अवलंब करण्याची लोकांची जागरूकता आणि इच्छा जाणून घेण्यात आली.


जागतिक पेपर बॅग दिनानिमित्त सर्वेक्षण


प्लास्टिक प्रदूषणाच्या हानिकारक घटकांबद्दल जागरूकता पसरवणे आणि पर्यावरणास अनुकूल पर्यायांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 12 जुलै रोजी जागतिक 'पेपर बॅग दिन' (Paper Bag Day) साजरा केला जातो. सर्वेक्षणातील 85 टक्के प्रतिसादकर्त्यांना याची जाणीव आहे की, भारतात एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे. या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, किराणा सामान आणि दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडताना जवळपास 79 टक्के लोक स्वतःची बॅग घेऊन जातात.


कागदी पिशव्यांसाठी थोडी रक्कम देणं सोयीचं


शिवाय, सर्वेक्षण केलेल्यांपैकी 46 टक्के लोकांनी सर्वेक्षणात (Survey) असं म्हटलंय की, 'दुकानदारांनी ऑफर केल्यावर प्लास्टिक पिशव्या स्वीकारण्यास आम्ही ठामपणे नकार देतो.' तसेच, खरेदी करताना स्टोअर्सद्वारे पुरविलेल्या कागदी पिशव्यांसाठी थोडी रक्कम देणे ग्राहकांना सोयीचे आहे का असे विचारले असता, 62 टक्के लोकांनी या वाक्याला होकारार्थी प्रतिसाद दिला.


80 टक्के लोकांचा कागदी पिशव्यांना समर्थन 


उज्वल भविष्य घडवण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून सर्व दुकानांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदी पिशव्या वापरल्या जाव्यात, असेही सर्वेक्षणातील जवळपास 80 टक्के लोकांनी आपलं मत व्यक्त केलं. सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून असे दिसून आले आहे की, 53 टक्के लोक असे मानतात की प्लास्टिकच्या पिशव्या कागदी पिशव्यांपेक्षा अधिक सोयीस्कर आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Delhi Yamuna Flood : दिल्लीत तब्बल 45 वर्षांनंतर यमुनेच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्याही पुढे; पूरस्थिती पाहता सरकार सतर्क