New Delhi Railway Station Stampede: धावाधाव, आरडाओरड अन् किंकाळ्या...; नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत 18 जणांनी गमावला जीव, हादरवणारे PHOTO
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement
New Delhi Railway Station Stampede
Continues below advertisement
1/10
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत (New Delhi Railway Station Stampede) 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
2/10
प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घटली.
3/10
दिल्ली स्टेशनवरुन प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली.
4/10
प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा होताच स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला.
5/10
मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि 10 महिलांसह 18 जणांचा मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
Continues below advertisement
6/10
घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
7/10
मोठ्या संख्येने लोकांकडे जनरल तिकिटे होती, अशी माहितीही समोर आली आहे.
8/10
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. यासाठी देशभरातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून लोक तेथे जात आहेत.
9/10
दरम्यान, शनिवारी रात्री (15 फेबुवारी) नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
10/10
अचानक रात्री 8.30-9 वाजताच्या दरम्यान प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले आणि चेंगराचेंगरी झाली.
Published at : 16 Feb 2025 07:17 AM (IST)