एक्स्प्लोर

Wrestlers Protest: आंदोलक पैलवान पदक विसर्जित करण्यासाठी गंगा तिरावर, श्रीगंगा सभेचा कुस्तीपटूंच्या निर्णयाला विरोध

Wrestlers Protest News: कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. पदक गंगेत विसर्जित केल्यानंतर कुस्तीपटू इंडिया गेटवर उपोषण करणार आहेत.

Wrestlers Protest News: भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sigh) यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी (wrestlers) केंद्र सरकारचा निषेध म्हणून त्यांची पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कुस्तीपटू पदकांनी भरलेल्या बॅगा घेऊन हरिद्वार येथे गंगा किनाऱ्यावर जमले आहेत. परंतु या निर्णयाला श्रीगंगा सभेनं विरोध केला आहे.

गंगा हे श्रीक्षेत्र आहे आणि त्याला राजकारणाचा आखाडा बनवू नका, असं आवाहन श्रीगंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम यांनी केलं आहे. सर्व खेळ हे अमर असतात आणि पदकांना अस्थी समजून विसर्जित करू नका, असंही नितीन गौतम यांनी म्हटलं आहे. गंगेच्या तिरावर पूजा केली तरी चालेल, पण असे प्रकार करु नका, असं त्यांनी म्हंटलं आहे. गंगेत पदकं प्रवाहित करण्याच्या कुस्तीपटूंच्या निर्णयाला श्रीगंगा सभेने विरोध केला आहे. 

आम्ही पदक का कमावले?

विनेश फोगाटने ट्विटरवर एक पत्र शेअर केले आहे. या पत्रात विनेशने म्हटले आहे की, 28 मे रोजी आमच्यासोबत झालेला प्रकार सर्वांनी पाहिला. त्यानंतर या देशात आमच्यासाठी काहीच राहिलं नााही. आजही आम्हाला तो क्षण आठवतो ज्या दिवशी आम्ही देशासाठी ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियशनशिप पदक कमावले. परंतु दोन दिवसापूर्वी झालेल्या प्रकारानंतर आता आम्हाला वाटतं, आम्ही ही पदकं का कमावली? 

28 मे रोजी कुस्तीपटूंनी दिल्ली पोलीस प्रशासनाकडून उद्विघ्न वागणूक मिळाली आणि या प्रकाराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आम्हाला देशात इतकी वाईट वागणूक मिळत असेल, तर या पदकांचा तरी काय उपयोग? असा प्रश्न विचारत त्यांनी सर्व पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमरण उपोषणाचा इशारा

गंगा नदीत पदक विसर्जित केल्यानंतर आमच्या आयुष्यात करण्यासारखे काही उरलेच नाही, त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार आहोत, अशी प्रतिक्रिया कुस्तीपटूंनी दिली आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेटवर युद्धात भारतीय सेनेच्या सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारलं होतं. आम्ही त्यांच्याइतके महान नाही, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आमची भावना देखील त्या सैनिकांप्रमाणेच होती, अशी प्रतिक्रिया देखील कुस्तीपटूंनी दिली.

कुस्तीपटू आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की

विनेश फोगट, तिची चुलत बहीण संगीता फोगट आणि साक्षी मलिक यांनी 28 मे रोजी जंतरमंतर येथे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुस्तीपटू आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. हा सर्व प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसदेचं लोकार्पण करत असताना भर रस्त्यात सुरु होता. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून कुस्तीपटूंना बसमध्ये भरून विविध ठिकाणी नेल्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांनी जंतर मंतरवरील खाटा, गाद्या, कुलर, पंखे, ताडपत्री तसेच इतर पैलवानांचे सामान काढून टाकत तंबूही उखडून टाकले होते. काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, आप, शेतकरी नेते, राष्ट्रवादी काँग्रेसने कुस्तीपटूंना देण्यात आलेल्या वागणुकीचा निषेध करत मोदी सरकारवर सडकून प्रहार केला.

हेही वाचा:

Wrestlers Protest: आंदोलक कुस्तीपटूंवर भर रस्त्यात दिल्ली पोलिसांची बळजबरी; अटकेची कारवाई करत जंतर मंतरवरील तंबूही उखडून टाकले

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget