एक्स्प्लोर

खासगी महाविद्यालयांना 'नीट' कायम : तावडे

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सरकारी मेडिकल महाविद्यालयातील 2810 जागांचे प्रवेश हे सीईटीप्रमाणेच होतील. मात्र ज्या खासगी महाविद्यालयातील जागा सरकारी CET द्वारे भरण्यात येतात, त्यांनाही 'नीट'मधून सवलत देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी याबाबतची माहिती दिली. खासगी महाविद्यालयांना 'नीट' कायम : तावडे असं असलं तरी  महाराष्ट्रामध्ये खाजगी महाविद्यालयाच्या जागा सरकारकडे नाहीत. त्यामुळे  महाराष्ट्रातील सर्व खाजगी महाविद्यालयांना 'नीट' लागूच राहणार , असं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.   दुसरीकडे अभिमत (डीम्ड) विद्यापीठांचे प्रवेश हे नीट परीक्षेद्वारेच होणार आहेत.   राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज 'नीट' परीक्षेबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. त्यानंतर नड्डा यांनी सविस्त माहिती दिली.   अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी   'नीट' परीक्षेतून सुटका मिळावी ही राज्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. मात्र विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि विविध राज्य सरकारांची मागणी लक्षात घेऊन, केंद्र सरकारने याबाबत अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार यंदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची 'नीट'मधून सुटका होईल.   नीटचा घोळ मेडिकल प्रवेशासाठी ‘नीट’ ही एकच परीक्षा देशभर घेतली जावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. राज्यातील सीईटी रद्द करुन नीट परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढावली होती.   सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?   याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करुनही सर्वोच्च न्यायालय आपल्या निर्णयावर ठाम होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेतली. नीट आणि राज्यांतील सीईटी परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोठा फरक आहे. त्यामुळे नीटनुसार परीक्षा घेण्यात आम्हाला दोन वर्षांची मुदत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती.   तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात    अध्यादेशाला मान्यता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने नीट’ परीक्षेबाबतच्या अध्यादेशाला मान्यता दिली होती. या अध्यादेशामुळे मेडिकल प्रवेशासाठी इच्छुक  लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.  हा अध्यादेश मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे गेला. त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याने राज्यातील 2810 जागा या सीईटी परीक्षेतून भरल्या जातील.   शिक्षणमंत्री तावडेंचे प्रयत्न   केंद्रीय अभ्यासक्रमाच्या  अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमाच्या धर्तीवर नीटची परिक्षा घेण्यात येते. सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात जास्त फरक नाही. परंतु सीबीएसईची परिक्षा पध्दती आणि राज्य शिक्षण मंडळाची परिक्षा पध्दत यामध्ये फरक आहे. त्यामुळे सीबीएसईच्या धर्तीवर होणारी नीट परिक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना अवघड वाटते. त्यामुळे पुढील वर्षी होणारी नीट परिक्षा विद्यार्थ्यांना अवघड जाऊ नये यासाठी  आपण उच्च माध्यमिक (एचएससी) बोर्डाच्या अध्यक्षांना दोघांचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पध्दतीत काय बदल करता येऊ शकेल याबाबत शिक्षणतज्ज्ञांची बैठक घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार बदल करण्यात येतील जेणेकरुन विद्यार्थ्यांना पुढील वर्षी होणा-या नीट परिक्षेचा अभ्यास वेळेमध्ये करता येईल असं तावडे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं.   संबंधित बातम्या

अखेर राष्ट्रपतींची 'नीट' अध्यादेशावर स्वाक्षरी

‘नीट’मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश! ‘नीट’प्रश्नी मुख्यमंत्री आज पंतप्रधानांची भेट घेणार ‘नीट’ प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘नीट’ प्रश्नी सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थ्यांना दिलासा नाही ‘नीट’विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार त्यापेक्षा अभ्यास करा, ‘नीट’बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली ‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Embed widget