NEET Exam Paper Leak Case : नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणी (NEET Paper Leak Case) सीबीआयनं (CBI) पोलिसांनी पेपरफुटीचा (Paper Leak Case) खुलासा केला होता. Evoyu नं तपासाची जबाबदारी घेतली. पण, आता हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. याप्रकरणी रविवारी सीबीआयनं आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी केली.


नीट परीक्षेचा घोळ, CBI कडून आरोपींची चौकशी 


सर्व प्रश्नांसह, 22 जून रोजी, शिक्षण मंत्रालयानं NEET UG पेपर लीक प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर तपास यंत्रणा पुढे आल्या आणि एफआयआर नोंदवून सर्व प्रकरणं ताब्यात घेतली. अटक आरोपींना ताब्यात घेऊन आता पेच घट्ट करण्यात आला आहे. सीबीआयची पथकं वेगवेगळ्या शहरात आहेत. पाटण्यात आरोपींची चौकशी सुरू आहे. गोध्रा येथील एका शाळेच्या ट्रस्टीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील लातूरचं प्रकरणही सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. तीन शहरांमध्ये सुरू असलेल्या सीबीआय तपासाची आतापर्यंतची ही परिस्थिती आहे. एक दिवसापूर्वी सीबीआयचं पथक बेऊर तुरुंगात पोहोचलं. नीट प्रकरणातील 13 आरोपी अटकेत आहेत. सीबीआयनं जेलमध्ये जाऊन या 13 आरोपींचे जबाब नोंदवले. तसेच, त्यांची चौकशी देखील केली. 


महाराष्ट्रातील लातूर पेपरफुटी प्रकरणही सीबीआयनं आपल्या ताब्यात घेतलं आहे. देशभरात गाजलेल्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण देशभरात आढळून आले होते. लातुरातील जिल्हापरिषदेचे दोन शिक्षक याप्रकरणी अटकेत आहेत. त्यानंतर दोन्ही शिक्षकांचं निलंबन झालं असून 


सीबीआयची शक्कल, सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी 


13 आरोपींची सीबीआयची चौकशी तुरुंगात जवळपास 3 तास चालली. रिमांडवर घेतलेल्या आरोपींचीही अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू ठेवली. यासोबतच ओएसिस शाळेचे प्राचार्य एहसानुल हक, केंद्र अधीक्षक इम्तियाज आलम आणि एका पत्रकाराची चौकशी करण्यात आली. चिंटू, मुकेश आणि इतर आरोपींचं पहिल्यांदा स्वतंत्र जबाब नोंदवण्यात आले. मात्र, आरोपींनी घुमजाव करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सीबीआयनं सर्व आरोपींना एकमेकांसमोर बसवून चौकशी केली. यावेळी मात्र आरोपींच्या उत्तरांमध्ये प्रचंड विरोधाभास आढळून आला. त्यामुळे सीबीआयचा संशय अधिक बळावला. सीबीआयचं पथक बेऊर कारागृहात बंद असलेल्या आरोपींची चौकशी करून याप्रकरणातील आणखी काही गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणातील आतापर्यंतची सर्वात मोठी अटक हजारीबाग शाळेचे मुख्याध्यापक एहसान उल हकची आहे.


सीबीआयचा कसून तपास 


सीबीआयनं एहसानुल हकच्या बँक तपशीलांचीही चौकशी केली आहे. अन्य दोन आरोपींचे कॉल डिटेल्सही तपासण्यात आले आहेत. 5 मे रोजी पाटण्यात एनईईटी पेपर फुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अटक आरोपींच्या माहितीवरून छापा टाकला होता. अर्धी जळालेली कागदपत्रं जप्त करण्यात आली. त्या कागदपत्रांमध्ये प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्सचाही समावेश होता. त्यापैकी 68 प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी मिळते जुळते होते.


सीबीआयच्या पथकानं हजारीबागमध्ये 11 जणांची चौकशी केली आहे. काहींना चौकशीनंतर सोडूनही देण्यात आलं आहे. परंतु प्राचार्य एहसानुल हक यांच्यावर सातत्यानं कडक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एनटीएच्या दोन निरीक्षकांचीही चौकशी करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या दोन उपअधीक्षक आणि 4 निरीक्षकांकडूनही प्रश्न विचारण्यात आले. ओएसिस शाळेच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआरही जप्त करण्यात आला आहे.


काय आहे लातूर नीट प्रकरण? (NEET Paper Leak Latur Connection)


लातूर पोलिसांनी नीट पेपर फुटी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या चार जणांपैकी दोन जणांना अटक करण्यात लातूर पोलिसांना यश आलं आहे. त्यात जलील पठाण आणि संजय जाधव यांचा समावेश आहे. फरार आरोपीमध्ये इराण्णा आणि गंगाधर यांचा शोध सुरू आहे. 


या चार जणांनी मिळून लातूर मधील अनेक विद्यार्थ्यांना परराज्यामध्ये नीट परीक्षा देण्यासाठी तयार केलं होतं. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचं बोललं जातंय. आरोपींच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांचे बारा अॅडमिट कार्ड सापडले आहेत. त्यापैकी आठ अॅडमिट कार्ड ही परराज्यातील आहेत. या आठ अॅडमिट कार्ड पैकी सात अॅडमिट कार्ड बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची असून एक ऍडमिट कार्ड लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं आहे. या टोळीचे कनेक्शन्स देशातील कोणत्या राज्यात आहेत याचा तपास सीबीआय करणार आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI