एक्स्प्लोर
नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात चार नवी केंद्र
नवी दिल्ली : देशभरात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा अर्थात नीटसाठी 23 नवी केंद्र सुरु केली आहेत. यानुसार राज्यात चार नव्या केंद्रांची भर पडली आहे. अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्हांमध्ये अतिरिक्त केंद्र सुरु करण्यात आली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
नीटसाठी राज्यात आतापर्यंत नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद अशी केवळ सहाच केंद्र होती. आता त्यात चार अतिरिक्त केंद्रांची भर पडल्याने ही संख्या 10 वर पोहोचली आहे.
परंतु मराठवाड्यात एकही नवीन केंद्र मिळालेलं नाही. त्यामुळे मराठवाड्यासाठी औरंगाबाद हे एकमेव केंद्र आहे.
यापूर्वी नीट परीक्षा 80 शहरांमध्ये घेतली जात असे. पण आता 23 नव्या केंद्रामुळे 2017 ची नीट परीक्षा 103 शहरांमध्ये होणार आहे.
चांदा ते बांदा, राज्यात नीटसाठी फक्त सहाच परीक्षा केंद्र!
या शहरात नीटचे नवी केंद्र
आंध्र प्रदेश - गुंटूर
आंध्र प्रदेश - तिरुपती
गुजरात - आणंद
गुजरात - भावनगर
गुजरात - गांधीनगर
कर्नाटक - दावणगिरी
कर्नाटक - हुबळी
कर्नाटक - म्हैसूर
कर्नाटक - उडपी
केरळ - कन्नूर
केरळ - थ्रिसूर
महाराष्ट्र - अहमदनगर
महाराष्ट्र - अमरावती
महाराष्ट्र - कोल्हापूर
महाराष्ट्र - सातारा
पंजाब - अमृतसर
राजस्थान - जोधपूर
तामिळनाडू - नमक्कल
तामिळनाडू - तिरुनेलवेली
तामिळनाडू - वेल्लोर
उत्तर प्रदेश - गोरखपूर
पश्चिम बंगाल - हावडा
पश्चिम बंगाल - खरगपूर
‘नीट’साठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवणार, सुत्रांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement