एक्स्प्लोर
दिल्लीच्या VVIP सुरक्षा असलेल्या विजय चौकात नीलगायीचा संचार
![दिल्लीच्या VVIP सुरक्षा असलेल्या विजय चौकात नीलगायीचा संचार Neelgay Found In Delhis Vvip Vijay Chowk Area दिल्लीच्या VVIP सुरक्षा असलेल्या विजय चौकात नीलगायीचा संचार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/26101429/nilgai-at-vijay-chowk2-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : मानवी वस्तीत जंगली प्राणी शिरल्याचं आपण ऐकतो, मात्र चक्क दिल्लीतल्या संसद परिसरासारख्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये नीलगाय आढळल्याने खळबळ उडाली आहे.
संसदेसमोरच्या विजय चौक परिसरात एक नीलगाय आरामात फिरत असल्याचं दिसून आलं आणि सगळ्यांची चांगलीच पाचावर धारण बसली. नीलगाय पाहिलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली.
मंत्री, खासदार, व्हीआयपींचा राबता असलेल्या संसदेच्या परिसरात नीलगाय शिरल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे पशुपालन विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली.
मात्र तब्बल दोन तासांनंतरही पशुपालन विभागाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहचला नव्हता. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या जागेची सुरक्षाव्यवस्था रामभरोसे आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पाहा अधिक फोटो :
दिल्लीच्या VVIP सुरक्षा असलेल्या विजय चौकात नीलगाय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)