Kamal Khan Passes Away : उत्तर प्रदेशमधील ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानं आज लखनौमध्ये त्यांचं निधन झालं असल्याची माहिती आहे. घरी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
कमाल खान आपल्या रिपोर्टिंगच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. ते एनडीटीव्हीचे लखनौ (उत्तरप्रदेश) प्रतिनिधी होते. 1960 साली जन्मलेल्या कमाल खान यांनी केलेली अनेक वार्तांकनं चर्चेत राहिली. आपल्या जवळपास तीन दशकाच्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. भाषेवर त्यांचं खूप चांगलं प्रभूत्व होतं.
अनेकांकडून श्रद्धांजली
उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी कमाल खान यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. मायावतींनी म्हटलं आहे की, एनडीटीव्हीचे प्रतिष्ठित आणि नावाजलेले पत्रकार कमाल खान यांचं अचानक निधन झालं. ही अत्यंत दु:खद आण पत्रकारिता विश्वाची मोठी हानी आहे. त्यांच्या परिवार आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत. मायावती यांच्यासह अनेक दिग्गजांनी कमाल खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Uttar Pradesh Election 2022 Date: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, सात टप्प्यात होणार मतदान
- Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
- Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकीचा महासंग्राम; आधीचं बलाबल काय? यावेळी हे मुद्दे गाजणार
- ABP News C Voter Survey : कोरोना, मोदींचा चेहरा की योगींचं काम....निवडणुकीत कोणता मुद्दा ठरणार प्रभावी, पाहा काय म्हणतेय जनता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह