ABP C-Voter 2022 Election Survey  : पुढील दोन दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजणार आहे. त्यामुळे येथील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहेत. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बसपासह इतर पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.  उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ आपली सत्ता राखणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. 75 जिल्ह्याच्या उत्तर प्रदेशमधील राजकीय हलचालींना वेग आलाय. अशातच एबीपी न्यूजने सी-वोटर सर्व्हेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील जनतेचा कौल जाणून घेतलाय. यासाठी उत्तर प्रदेशमधील जनतेला विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. 


 उत्तर प्रदेश निवडणुकीत कोणता मुद्दा प्रभावी ठरणार? असा प्रश्न तेथील जनतेला सर्व्हेमध्ये विचारण्यात आला. यामध्ये ध्रुवीकरण, शेतकरी आंदोलन,  कोरोना, कायदा आणि सुव्यवस्था, योगी सरकारचे काम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि अन्य हे पर्याय देण्यात आले होते. सात जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये १७ टक्के लोकांनी धुर्वीकरण हा पर्याय निवडला. तर २१ टक्के मतदारांनी शेतकरी आंदोलन हा प्रभावी मुद्दा ठरेल असे सांगितले. १६ टक्के लोकांनी कोरोना, १७ टक्के लोकांनी कायदा आणि सुव्यवस्था, ११ टक्के लोकांनी राज्य सरकारचे कामकाज, ८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा तर १० टक्के लोकांनी अन्य हा पर्याय निवडला.  


याआधी ३० डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील लोकांना हाच प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा १७ टक्के लोकांनी धुर्वीकरण, २२ टक्के लोकांनी शेतकरी आंदोलन, १७ टक्के लोकांनी कोरोना, १५ टक्के लोकांनी कायदा आणि सुव्यवस्था, ११ टक्के लोकांनी योगी सरकारचं काम, सात टक्के लोकांनी मोदींचा चेहरा आणि अन्य ११ टक्के, अशी पसंती जनतेने दिली होती.


नोट - पुढील काही दिवसांत पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांत निवडणुकासंदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूजने मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी सी व्होटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जातो.