NDA Goverment Portfolios : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे विश्वासू आणि भाजपचे सर्वाधिक शक्तीशाली नेते अमित शाह यांची एनडीए सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. बिझीनेस वर्ल्डने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. अमित शाह 2019 पासून देशाचे गृहमंत्री आहेत. परंतु, पंतप्रधान काही खात्यांमध्ये फेरबदल करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे अमित शाह निर्मला सीतारामन यांच्या जागी होण्याची शक्यता आहे, ज्यांना दुसरे मंत्रिपद दिले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 






1990 च्या दशकापासून जेव्हा दोघेही पक्षाचे कार्यकर्ते होते तेव्हापासून शाह हे मोदींचे सर्वात विश्वासू राईट हँड आहेत. 2024 च्या निवडणुकीत शाह यांनी 7 लाखांहून अधिक मतांनी गांधीनगर लोकसभेची जागा जिंकली आहे. पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशमधील वाराणसीची जागा 1.5 लाख मतांच्या फरकाने जिंकली आहे. भाजपचे आणखी ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह हे शाह यांच्या जागी देशाचे गृहमंत्री बनण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. अंमलबजावणी संचालनालय (ईडी), एसएफआयओ (गंभीर फसवणूक तपास कार्यालय) यासारख्या प्रीमियम तपास संस्था शाह यांच्या अधिपत्याखाली असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही महत्त्वाचे मंत्रिपद मिळू शकते, असे सूत्रांनी सांगितले. चौहान यांनी 8.21 लाख मतांनी खासदारकीची विदिशा जागा जिंकली आहे.


शाह यांनी गुजरातमध्ये अर्थमंत्री म्हणून खाते सांभाळले होते


भाजपचे माजी नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली आजारी असताना त्यांनीच पंतप्रधान मोदींना निर्मला सीतारामन यांना पुढील अर्थमंत्री बनवण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनी इच्छा मान्य केली आणि त्यांचे काम चालू ठेवले, अन्यथा अर्थमंत्री म्हणून शाह हे नेहमीच पंतप्रधानांची निवड होते, असे सूत्रांनी सांगितले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना शाह यांनी गुजरातमध्ये अर्थमंत्री म्हणून खाते सांभाळले होते.


शहा यांचे जवळचे कुटुंबीय आर्थिक बाजारपेठेत आहेत आणि त्यांनी नेहमीच वित्त आणि शेअर बाजारांमध्ये उत्सुकता दाखवली आहे, असे जाणकार सूत्रांनी सांगितले. मोदी सरकारच्या द्वितीय कार्यकाळातील केवळ 21 मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे, तर 20 मंत्री लोकसभा निवडणुकीत भुईसपाट झाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या