Jammu & Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्याने भाविकांच्या बसवर गोळीबार केला. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी या तिर्थस्थळावरुन परत येत असलेल्या बसवर रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत कोसळली. या दुर्देवी घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले आहेत.


दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर शिवखोडी मंदिराकडून कटराकडे जाणारी 53 आसनी बस खोल दरीत कोसळल्याचं पोलिसांनी सांगितले.  पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ ही घटना घडली. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली अन् स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. तब्बल दोन तास हे बचावकार्य चालल्याचं समजतेय.  पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफच्या मदतीने परिसरात शोधमोहीम सुरु केली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी धाडसत्र सुरु आहे. हल्लेखोर याच परिसरात राजौरी, पूँछ आणि रियासी या भागात लपून राहणाऱ्यांपैकी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


सर्व भाविक उत्तर प्रदेशमधील ?


बसमधील सर्व प्रवासी उत्तर प्रदेशमधील असल्याचं समोर आलेय. ही बस रियासीवरुन कात्राच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी संध्याकाळी 6.15 मिनिटांनी संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् बस दरीत कोसळली. या दुर्घेटनेत दहा जणांना मृत्यू झालाय. 33 जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक मोहित शर्मा यांनी सांगितले. 


उत्तर प्रदेशमधील भाविकांना घेऊन ही बस शिवखोडी मंदिरापासून कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जात होती. याच दरम्यान पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ संध्याकाळी 6.15 च्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. गोळीबारानंतर चालकाचे नियंत्रण सुटले अन् 53 आसनी बस खोल दरीत कोसळली. रियासीचे पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा म्हणाले की, “ मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिवखोडी येथून कटरा जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात पडली, बचावकार्य पूर्ण झाले. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.






मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, परंतु प्राथमिक अहवालानुसार ते सर्व उत्तर प्रदेशचे आहेत, असेही शर्मा म्हणाले. रियासीसह जम्मू विभागातील विविध भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात लोकांच्या अनेक गटांनी निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.