एक्स्प्लोर
ABP EXCLUSIVE : नवाज शरीफ यांचं UN मधील भाषण लीक

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर जगभरातील अनेक देश पाकिस्तानच्या विरोधात गेले आहेत. यूएनमधील सर्व देशांची समजूत काढण्यामध्येच पाकिस्तानचे पंतप्रधान व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या दरम्यान, नवाज शरीफ यांचं यूएनमधील प्रस्तावित भाषण लीक झालं आहे. यूएनमध्ये नवाज शरीफ यांचं भाषण होणार आहे. या भाषणात शरीफ ज्या मुद्द्यांवर बोलणार आहेत, त्यातील 8 मुद्दे लीक झाले आहेत. एबीपी न्यूजच्या सूत्रांच्या हाती शरीफ यांच्या भाषणातील मुद्दे लागले आहेत. शरीफ यांच्या भाषणात काय असेल?
- भारतातील जम्मू-काश्मीरची स्थिती
- स्वातंत्र्याची मागणी
- काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं कथित उल्लंघन
- जम्मू-काश्मीरमध्ये पेलेट गनचा वापर
- कथित हेर कुलभूषण यादव
- संयुक्त राष्ट्राकडून कारवाईची मागणी
- पाकिस्तानमध्ये शांतता
- पाकिस्तानही दहशतवादापासून त्रस्त
Before You Go
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

नरेंद्र बंडबे
Opinion




















