चंदीगड : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, तिकडे पंजाबमध्ये माजी क्रिकेटर नवज्योतसिंह सिद्धू कोणत्या पक्षाकडून लढणार हे सुद्धा स्पष्ट झालं आहे.

भाजपला रामराम केलेला सिद्धू आता पंजाबमध्ये काँग्रेच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सिद्धू त्याची पत्नी नवजोत कौरचा मतदारसंघ अमृतसर ईस्टमधून निवडणूक लढवणार आहे. सध्या सिद्धूची पत्नी या मतदारसंघाची आमदार आहे. मात्र नवजोत कौर निवडणूक लढवणार नाही.

सिद्धूने गेल्या वर्षीच भाजपचा राजीनामा दिला.

संबंधित बातमी


सिद्धू काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार?