एक्स्प्लोर

पुलवामा हल्ल्यानंतरचं वादग्रस्त विधान सिद्धूला भोवणार, मंत्रिमंडळातून हकालपट्टीची शक्यता

पुलवामा हल्ल्यानंतरचं वादग्रस्त विधान नवज्योतसिंह सिद्धूला भोवणार असल्याचं दिसत आहे. सिद्धूची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पंजाब काँग्रेसकडून झाली आहे. तसेच त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

अमृतसर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारताच्या सीआरपीफ जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली. देशभरातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी होऊ लागली. परंतु माजी क्रिकेटर आणि पंजाबचे सांस्कृतिक मंत्री नवज्योतसिंह सिद्धूने मात्र मवाळ भूमिका घेतली. सिद्धूने भारतीयांच्या संतापावर नाराजी व्यक्त करत दोन्ही देशांमधील वाद चर्चेतून सोडवण्याचा सल्ला दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुजोरी दाखवत सिद्धू शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला गैरहजर राहिला. त्यामुळे देशभरातून सिद्धूविरोधात नाराजीचा सूर आहे. कालपासून सिद्धूची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी देशभरातून होत आहे. पंजाबमधील अनेक मंत्र्यांनीदेखील अशीच मागणी केली आहे. आहे. त्यामुळे सिद्धूची मंत्रिंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाबचे मंत्री विपुल गोयल यांनी सिद्धू यांना ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी केली आहे. सिद्धूने ज्या पद्धतीने वक्तव्य केलं आहे, त्यानूसार त्याला कोणतंही संविधानिक पद भूषवण्याचा अधिकार नाही. केंद्र सरकार एकीकडे संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे सिद्धू आपल्या देशाऐवजी दहशतवादी राष्ट्राचं समर्थन करत आहे. त्यामुळे सिद्धूला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी काँग्रेसच्याच मंत्र्याने केली आहे. दरम्यान, टीव्हीवरील 'दी कपिल शर्मा शो' या कार्यक्रमामधूनही सिद्धूची हकालपट्टी करण्याचा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे. वाचा : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराला नवज्योतसिंह सिद्धू गैरहजर दरम्यान, सिद्धूच्या अशा वागण्यामुळे पंजाबच्या कॅबिनेटमधील मंत्री त्यांच्यावर नाराज आहेत. सिद्धूची पंजाबच्या कॅबिनेटमधून हकालपट्टी करा अशी मागणी आता होऊ लागली आहे. या घटनेमुळे #SackSidhuFromPunjabCabinet असा एक हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget