एक्स्प्लोर

युद्ध जिंकू शकत नाहीत ते आपल्या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतायेत, मोदींचा पाकिस्तानवर निशाणा

युद्ध जिंकू शकत नाहीत ते भारताच्या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या एकतेत फूट पाडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या सडेतोड उत्तर आम्ही दिलेलं आहे, असा शब्दात मोदींनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला.

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम 370 वरुन पाकिस्तानवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल मोदींनी म्हटलं की, काही लोक युद्ध जिंकू शकत नाही, म्हणून भारताच्या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

मी आज राष्ट्रीय एकता दिनानिमित्त लोकांना आठवण करुन देतो की, जे आपल्याशी युद्धात जिंकू शकत नाहीत, ते आपल्या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते विसरत आहेत की गेल्या कित्येक वर्षांपासून यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आमच्या एकतेत कुणीही फूट पाडू शकलेलं नाही. आमच्या एकतेत फूट पाडण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोड उत्तर आम्ही दिलेलं आहे. सरदार पटेल यांच्या आशीर्वादाने अशा शक्तींचा पराभव करण्याचा मोठा निर्णय देशाने काही आठवड्यांपूर्वीच घेतला. कलम 370 मुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावाद पसरविण्याशिवाय काहीही मिळालं नाही.

जम्मू काश्मीर देशातील एकमेव राज्य होतं, ज्याठिकाणी गेल्या तीन दशकात दहशतवादामुळे जवळपास 40 हजार नागरिकांचा बळी गेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कलम 370 जम्मू काश्मीर आणि भारतीयांसाठी एक भिंत बनली होती. या भिंतीमुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावाद वाढत होता. त्यामुळे आम्ही ती भिंत पाडून टाकली, असं मोदींनी म्हटलं.

काश्मीरचा मुद्दा माझ्याकडे असता तर हा प्रश्न मिटण्यासाठी उशीर लागला नसता, असं सरदार पटेल यांनी म्हटलं होतं. आज त्यांची जयंती आहे. त्यामुळे कलम 370 हटवण्याचा निर्णय आम्ही त्यांना समर्पित करतो, असं मोदींनी म्हटलं. आता जम्मू काश्मीरमध्ये राजकीय स्थिरता येईल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Embed widget