Post Office Small Saving Scheme : केंद्र सरकारकडून नागरिकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना आणल्या जातात. या योजनेत केलेली गुंतवणूक सुरक्षितही राहते. त्यामुळे या  बचत योजनांकडे सुरक्षित गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून पाहिले जाते. या योजनेत तुमच्या आर्थिक कुवतीनुसार पाच वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळू शकतो. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनांचा समावेश आहे. जर तुम्ही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत (NSC) 5 वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रति वर्षी मॅच्युरिटीवर 7.7 टक्के इतकं व्याज मिळू शकेल. यासाठी गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. तुमच्या आर्थिक उत्पन्नानुसार तुम्ही गुंतवणूक करू शकता. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेंतर्गत तुम्ही एक लाख रूपयांपासून ते 50 लाख रूपयांपर्यंतची गुंतवणूक केली, तर तुम्हाला 5 वर्षानंतर परतावा म्हणून किती रक्कम मिळेल याबद्दल सविस्तर माहिती घेऊया...


टॅक्समधून मिळते सूट


राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC) केंद्र सरकारची योजना आहे. या याजनेत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना खात्रीशीर परतावा मिळतो. यासोबत इतर अनेक सुविधांचा लाभही मिळतो. योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना टॅक्समधून सुट दिली जाते. यामुळे प्रति वर्षी 1.5 लाख रूपायांपर्यंतची रक्कम जमा केली जाऊ शकते. ही सूट आयकर विभागाच्या कलम 80 सी अंतर्गत देण्यात येते. यामुळे याजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना चांगलाच फायदा होऊ शकतो.


एक लाख रूपयापासून ते  50 लाख रूपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी किती रक्कम मिळते?


1. जर तुम्ही 1 लाख रूपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला 5 वर्षात 44,903 रूपये  व्याज आणि एकूण 1.44 लाख रूपये इतकी रक्कम मिळते.
2. तुम्ही 5 लाख रूपये  गुंतवणूक केली, तर 5 वर्षात व्याजाच्या स्वरूपात 2.44 लाख रूपये मिळतात आणि एकूण  7.24 लाख रूपये इतकी रक्कम मिळते. 
3. या याजनेत 10 लाख रूपयांची गुंतवणूक केली, तर 5 वर्षामध्ये 4.49 लाख रूपये व्याज मिळते आणि एकूण  14.49 लाख रूपये रक्कम मिळते.
4. तुम्ही जर 20 लाख रूपये गुंतवणूक केली, तर 8.98 लाख रूपये व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम 28.98 लाख रूपये रक्कम दिली जाते.
5. जर 30 लाख रूपये इतकी गुंतवणूक केली, तर 13.47 लाख रूपये व्याज आणि मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम 43.47 लाख  रूपये इतकी रक्कम मिळते.
6. जर 5 वर्षासाठी  40 लाख रूपये गुंतवण्यात आले, तर एकूण  57.96 लाख रूपये इतका फंड जमा होतो. यामधील 17.96 लाख रूपये इतकी
रक्कम व्याज स्वरूपात मिळते.
7. तुमचे  वार्षिक उत्पन्न चांगले असेल, तर 50 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर एकूण रक्कम 72.45 लाख रुपये इतकी मिळेल आणि त्यावर 22.45 लाख रूपये इतके व्याज मिळू शकेल. 


इतर बातम्या वाचा :


LIC : मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची काळजी? LIC 'या' योजनेमुळे लागेल हातभार


(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तुम्ही आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)