LIC Jeevan Tarun Policy: आजच्या काळात लोकांना गुंतवणुकीचे (Investment) विविध पर्याय उपलब्ध असल्याचं दिसून येतं. त्यामुळे देशातील एक मोठा वर्ग आजही भारतीय आयुर्विमा महामंडळला (LIC) आणि पोस्ट ऑफिस (Post Office Schemes) यामध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी पहिली पसंती देतात. देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा पॉलिसी कंपनी म्हणून एलआयसीकडे पाहिलं जातं. या विमा कंपनीकडून नागरिकांसाठी गुंतवणूकीचे वेगवेगळे पर्याय असणाऱ्या पॉलिसीज आणल्या जातात. आज कंपनीकडे अनेक कोटी पॉलिसी होल्डर आहेत.
एलआयसीकडून देशातील प्रत्येक आर्थिक घटकांचा विचार करून विविध पॉलिसीज तयार केल्या जातात. यातील काही योजना मुलांसाठी (LIC Policy for Children) तयार करण्यात आल्या आहेत. अशाच एका नवीन पॉलिसीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता दूर होण्यास मदत होईल. या योजनेचे नाव जीवन तरूण पॉलिसी (LIC Jeevan Tarun Policy) आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला किती परतावा मिळू शकतो. हे आज आपण जाणून घेऊया..
गुंतवणूक कोणत्या वर्षापासून सुरू कराल?
एलआयसीच्या जीवन तरूण पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळतो. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुलाचं वय कमीत कमी 3 महिने आणि जास्त जास्त 12 वर्ष असावं लागतं. यामध्ये मुलाचं वय 20 वर्ष होईपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा आहे. यानंतर 5 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली जात नाही. मात्र, मुलांचं वय 25 वर्ष पूर्ण केल्यानंतर या गुंतवणुकीच्या रक्कमेवर दावा करता येतो. यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च भागू शकतो. तसेच लग्नाची चिंताही दूर होईल आणि मुलांचं भविष्य सुरक्षित राहिल. त्यामुळे या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चांगला पर्याय आहे.
जास्तीत जास्त किती रक्कम मिळू शकते
जीवन तरूण पॉलिसी ही एक पार्टीसिपेटींग लिमिटेड पेमेंट योजना आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर 75,000 हजार रूपये इतक्या रक्कमेचा खात्रीशीर परतावा मिळू शकतो. पण जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवावी यासाठी कोणतीही मर्यादा नाही. या योजनेमध्ये तुम्ही दरमहा, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पद्धतीने गुंतवणूक करू शकता.
संपूर्ण गुंतवणुकीनंतर इतकी मिळेल रक्कम
समजा, एखाद्या पालकाने मुलाचे वय 12 वर्ष असताना जीवन तरूण पॉलिसी विकत घेतली. यानंतर त्यांनी दरदिवशी 150 रूपये इतकी रक्कम गुंतवायला सुरूवात केली तर वर्षभरानंतर जवळपास 54,000 हजार रूपये इतकी रक्कम तयार होईल. ही गुंतवणूक 8 वर्षांमध्ये एकूण 4 लाख 32 हजार रूपये इतकी होईल आणि या रक्कमेवर 2 लाख 47 हजार रूपये इतका लाभांश मिळू शकतो. या योजनेच्या नियमानुसार, मुल 25 वर्षाचं झाल्यानंतर त्याच्या बँक खात्यात जवळपास 7 लाख रूपये इतक रक्कम जमा होईल.
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तुम्ही आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)