National Education Day 2022 : 'राष्ट्रीय शिक्षण दिन' (National Education Day) दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abdul Kalam Azad) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले. 2008 मध्ये, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांचा वाढदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.


स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये मौलाना आझाद हे 1947 ते 1958 पर्यंत शिक्षणमंत्री होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी त्यांच्या कार्यकाळात शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. त्यांनी प्रौढ निरक्षरता, माध्यमिक शिक्षण, गरीब आणि महिलांचे शिक्षण यावर भर दिला. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळेच आज भारतातील युवक अभ्यासात परदेशी विद्यार्थ्यांना खडतर स्पर्धा देत आहेत. अमेरिका, जपान, ब्रिटनसह अनेक मोठ्या देशांमध्ये भारतीय तरुण आपल्या कौशल्याने भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत.


राष्ट्रीय शिक्षण दिनाची सुरुवात कोणी केली?


भारतात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यास अधिकृतपणे मानव संसाधन विकास मंत्रालयाने 2008 मध्ये सुरुवात केली. भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देश मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या योगदानाचा सन्मान केला जातो. 


राष्ट्रीय शिक्षण दिन 2022 ची थीम काय आहे? 


भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त एक वेगळी थीम जारी केली जाते. या वर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन 2022 ची थीम "अभ्यासक्रम बदलणे आणि शिक्षण बदलणे" आहे. 


राष्ट्रीय शिक्षण दिन 2022 चे महत्त्व काय आहे?


मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती हा भारताकडून राष्ट्रीय शिक्षण दिन 2022 साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे. भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून आझाद यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा दिवस पाळण्याची घोषणा केली.


महत्वाच्या बातम्या : 


Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस