Important Days in November 2022 : दिवाळीच्या सणानंतर आता दोन दिवसांतच नोव्हेंबर (November 2022) महिन्याला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर हा महिना अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. कारण याच महिन्यात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर लहान मुलांचा दिवस म्हणजेच बालदिन देखील याच दिवशी साजरा करतात. दिवाळीच्या नंतर सगळ्यांना आतुरता असते ती तुळशीच्या लग्नाची ती नोव्हेेबरमध्ये साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर या महिन्यात अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस देखील या महिन्यात येतात. हे दिवस नेमके कोणते ते जाणून घ्या.
1 नोव्हेंबर : राज्य स्थापना दिन (State Foundation Day) :
1 नोव्हेंबर या दिवसाचे भारताच्या इतिहासात फार मोठे महत्व आणि योगदान आहे. भारतातील तब्बल 7 राज्यांची निर्मिती ही 1 नोव्हेंबर या दिवशी झाली आहे. या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांचा स्थापना दिन वेगवेगळ्या वर्षी असतो मात्र एकाच दिवशी या सात राज्यांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली.
1 नोव्हेंबर : World Vegan Day
दरवर्षी 1 नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. व्हेगन डायट म्हणजे प्राणिजन्य अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप,अंडी हे पदार्थ देखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत आहे. 1944 साली इंग्लंडमध्ये व्हेगन ही संकल्पना जन्माला आली. याचे प्रणेते डोनाल्ड वॉटसन यांच्यावर महात्मा गांधींच्या अहिंसावादी तत्वज्ञानाचा प्रभाव होता.
4 नोव्हेंबर : प्रबोधिनी एकादशी
दिवाळीनंतर प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात प्रबोधिनी एकादशी विशेष महत्त्व आहे. या वर्षी 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रबोधिनी एकादशी आहे. या दिवसापासून लग्न, गृहप्रवेश, आदी सर्व कामे सुरू होतात. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील पाळले जाते.या एकादशी तिथीने श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्यांचा समावेश असलेला चातुर्मास कालावधी संपतो. असे मानले जाते की शयनी एकादशीला भगवान विष्णू झोपतात आणि या दिवशी जागे होतात. त्यामुळे तिला देवूठाण किंवा प्रबोधिनी म्हणतात.
5 नोव्हेंबर : तुळशी विवाह
तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.
5 नोव्हेंबर : Bhupen Hazarika Death
प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांची जयंती. भूपेन हजारिका (Bhupen Hazarika)यांचा जन्म 08 सप्टेंबर 1926 रोजी आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सादिया येथे झाला. त्यांच्या आसामी गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. भूपेन यांनी त्यांच्या संगीतामधून आसामची संस्कृती आणि कला लोकांपर्यंत पोहचवली. आसामी व्यतिरिक्त भूपेन हजारिका यांनी हिंदी, बंगाली यांसारख्या अनेक भाषांमध्ये गाणी गायली.
5 नोव्हेंबर : Virat Kohli Birthday
विराट कोहली हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इएसपीएनच्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या 2016 च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे.
7 : त्रिपुरारी पौर्णिमा
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन आणि उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.
7 November : National Cancer Awareness Day
'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन' हा दिवस सर्वप्रथम 2014 मध्ये साजरा करण्यात येईल असे तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जाहीर केले होते. त्यानुसार दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन (National Cancer Awareness Day)' देशभर साजरा करण्यात येतो. कर्करोग आणि त्याची लक्षणे तसेच त्याच्या उपचाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization - WHO) अभ्यासानुसार कर्करोग हे जगभरात होणाऱ्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.
8 : गुरू नानक जयंती
शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरू नानक देव यांचा आज जन्मदिवस. गुरू नानक यांच्या 553 व्या जयंतीनिमित्त देशातील असंख्य भाविक अमृतसरमध्ये जमा होतात. हा दिवस शिखधर्मियांसाठी पवित्र मानला जातो. गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त असंख्य शीख बांधव माथा टेकण्यासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात जमा होतात. ईश्वर एक आहे आणि त्याचे वास्तव्य चराचरात असल्याचा संदेश गुरु नानकांनी समाजाला दिला.
8 नोव्हेंबर : खग्रास चंद्रग्रहण
हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे. म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उद्यास येईल. त्यामुळे भारतात कोठेही ग्रहणस्पर्श दिसणार नाही. भारताच्या पूर्वेकडील काही प्रदेशांत खग्रास अवस्था दिसू शकेल. मात्र, महाराष्ट्र आणि इतर प्रदेशांत हे ग्रहण खंडग्रास दिसेल.
8 नोव्हेंबर : लालकृष्ण अडवाणी जन्मदिन (Lal Krishna Advani's Birthday) :
लालकृष्ण अडवाणी हे भाजपाचे नेते आहेत. ते सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे नेते होते आणि इ.स. 1974 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले.त्यांना आणीबाणीच्या दरम्यान कारावास घडला. इ.स. 1977 मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले तर इ.स. 1980 मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केल्यानंतर ते त्या पक्षात सामील झाले. ते इ.स. 1989 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.
9 नोव्हेंबर : Uttarakhand Foundation Day
उत्तराखंड स्थापना दिवस दरवर्षी 9 नोव्हेंबर रोजी भारताच्या 27 व्या राज्याच्या निर्मितीसाठी साजरा केला जातो. उत्तर प्रदेशच्या वायव्य भागातून आणि हिमालय पर्वतश्रेणीचा एक भाग असलेल्या अनेक जिल्ह्यांना जोडून उत्तराखंडची स्थापना 2000 मध्ये झाली. हे पूर्वी उत्तरांचल म्हणून ओळखले जात होते, तथापि, 2007 मध्ये त्याचे नाव उत्तराखंड करण्यात आले. यंदा 22 वा उत्तराखंड स्थापना दिवस आहे.
11 नोव्हेंबर : राष्ट्रीय शिक्षण दिन
राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले. 2008 मध्ये, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांचा वाढदिवस शिक्षण दिन म्हणून ओळखला जातो. तेव्हापासून दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.
12 नोव्हेंबर : संकष्ट चतुर्थी
आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते. यंदा संकष्टी चतुर्थी गुरुवारीर, 13 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. या वेळी चंद्रयोग 08.16 आहे.
12 नोव्हेंबर : World Pneumonia Day
दरवर्षी 12 नोव्हेंबर रोजी 'जागतिक न्यूमोनिया दिन (World Pneumonia Day)' साजरा करण्यात येतो. न्यूमोनियाबाबत जागरूकता वाढविणे, प्रतिबंध आणि उपचारांना प्रोत्साहित करणे तसेच रोगाचा मुकाबला करण्यासाठी कृती करणे या उद्देशांकरिता सदर दिवस साजरा केला जातो. बाल न्यूमोनियाविरूद्ध लढा देण्यासाठी जागतिक युतीद्वारे एक प्रयत्न म्हणून 12 नोव्हेंबर 2009 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. न्यूमोनियाशी संबंधित विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे सदर दिवस जगभर साजरा केला जातो.
14 नोव्हेंबर : बालदिन (Children's Day) :
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. 14 नोव्हेंबर 1889 रोजी प्रयागराज इथे त्यांचा जन्म झाला होता. लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण होता. मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. जगात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये 1856 मघ्ये चेल्सी इथे बालदिन साजरा झाला. त्याकाळी चर्चमध्ये लहान मुलांसाठी एक स्पेशल दिवस ठेवण्यात आला होता. लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या खास गोष्टी, वेगवेगळे खेळ आयोजित करून त्यांचा हा खास दिवसा साजरा करण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू जगातील इतर देशांमध्ये बालदिन साजरा करण्यास सुरूवात झाली.
14 नोव्हेंबर : जवाहरलाल नेहरू जयंती (Jawaharlal Nehru Jayanti) :
आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती (pandit jawaharlal nehru Birth anniversary) पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही महत्वाचे आहेत. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून काम पाहिले. 27 मे 1964 साली त्यांचं निधन झालं. पंतप्रधान म्हणून लोकशाहीला मजबूत करणे, देश आणि घटनेतील धर्मनिरपेक्ष छबी प्रस्थापित करणे आणि भारताच्या विकासात दीर्घकालीन फायद्याच्या ठरतील अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या. त्यांचे वडील मोतीलाल नेहरु हे प्रसिद्ध वकील होते. खूप कमी वयात शिक्षणासाठी पंडित जवाहरलाल नेहरु इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात उडी घेतली. विद्यार्थी दशेत असतानाही, परकीय जुलमी राजवटीखालील देशांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना रुची होती.
15 नोव्हेंबर : बिरसा मुंडा जयंती
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी. केवळ 24 व्या वर्षी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या बिरसा मुंडांनी एक वेगळीच छाप उमटवली आहे. 1857 चा उठाव दडपल्यानंतरही भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात ब्रिटिशांविरोधात उठाव सुरु झाले होते. त्यामध्ये 1895 ते 1900 सालाच्या दरम्यान मध्य भारतातील, छोटा नागपुरच्या प्रदेशात बिरसा मुंडा यांनी सुरु केलेली 'उलगुलान' चळवळ ही महत्वाची आहे. देशावर राज्य करणारे इंग्रज आणि आदिवासींचे धर्मांतर करणारे मिशनरी या दोघांच्या विरोधात लढा देण्यात बिरसा मुंडा यांनी आपले जीवन व्यतीत केलं.
17 नोव्हेंबर : लाला लजपतराय पुण्यतिथी
शेर-ए-पंजाब या उपाधीने सन्मानित लाला लजपत राय यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाल-बाल-पाल या तीन प्रमुख नायकांपैकी ते एक होते. लाला लजपतराय निस्सिम देशभक्त, शूर स्वातंत्र्यसैनिक आणि एक चांगले नेता तर होतेच तसेच ते एक उत्तम लेखक, वकील, समाजसुधारक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.
19 नोव्हेंबर : इंदिरा गांधी जयंती (Indira Gandhi Birth Anniversary) :
इंदिरा गांधी या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. माजी पंतप्रधान आणि 'आयर्न लेडी' म्हणून ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी मोगलसराई येथे झाला. 1966 मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्यांनी 1966 ते 1977 या काळात सलग तीन वेळा देशाची सूत्रे हाती घेतली.
19 नोव्हेंबर : जागतिक पुरुष दिन (International Men's Day) :
जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. त्याच धरतीवर 1923 साली काही पुरुषांनी दरवर्षी 23 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची मागणी केली होती. पण त्यावेळी यावर काही निर्णय झाला नाही. सन 1991 साली हा दिवस साजरा करण्याची पुन्हा एकदा संकल्पना मांडण्यात आली. शेवटी 1999 पासून त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या नागरिकांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला आणि जगभरात याचे पालन सुरु झालं. डॉ. जीरोम तिलकसिंह यांचे या क्षेत्रातले योगदान लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांच्या जन्मदिवसानिमित्त 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात सर्वप्रथम 2007 साली आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील सुमारे 80 देशांत हा दिवस साजरा केला जातो.
19 नोव्हेंबर : जागतिक शौचालय दिन (World Toilet Day) :
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे '19 नोव्हेंबर' हा दिवस 'जागतिक शौचालय दिन' म्हणून जाहीर केला आहे. जगभर या दिनी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येत आहे. आज भारतात कित्येक स्त्री-पुरुषांना असुविधेमुळे उघड्यावर शौचास बसावे लागते. त्यामुळे रोगराई मोठ्या प्रणावर फैलावते.
21 नोव्हेंबर : जागतिक टेलिव्हिजन दिन (World Television Day) :
1996 मध्ये संयुक्त राष्ट्राकडून पहिली वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम बोलावण्यात आली होती. यामध्ये जगभरातील टिव्ही इंडस्ट्रीतील प्रमुख लोक सहभागी झाले होते. सर्वांनी वैश्विक राजनिती आणि डिसिजन मेकिंगमध्ये टेलिव्हिजनच्या सहभागाविषयी चर्चा केली. यावेळी सर्वांनी असा निष्कर्ष काढला की, समाजात दिवसागणिक टिव्हीचं महत्त्व वाढत आहे. यानंतर संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंबलीने 21 नोव्हेंबर रोजी 'वर्ल्ड टेलिविजन डे' घोषित करण्यात आला. हा निर्णय वैश्विक सहकार्य वाढविण्यासाठी टेलिव्हिजनचं योगदान वाढविण्यासाठी घेण्यात आला होता.
24 नोव्हेंबर : गुरु तेगबहादूर शहीद दिन
शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या मृत्युनंतर 1664 मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून शिखांनी गादीवर बसविले. गुरु तेगबहादूर सिंहजी धार्मिक प्रचारासाठी आपल्या अनुयायांसह विविध ठिकाणी यात्रा करत असत. तेगबहादुरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत आपल्या धर्माचा प्रसार करून अनेक हिंदुंना व मुसलमांनानाही शीख धर्माची दीक्षा दिली.
24 नोव्हेंबर : देव दीवाळी
देव दिवाळी हा सण महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात साजरा होतो. या दिवशी देव-देवतांची दिवाळी असते असे मानले जाते. या दिवशी बळीच्या राज्यातून श्रीविष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशीही समजूत प्रचलित आहे. या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे मानले जाते. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते.
26 नोव्हेंबर : संविधान दिन (Constitution Day of India) :
26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील हा दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. तर, 26 जानेवारी, 1950 रोजी हे संविधान लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भारत सरकारने 2015 मध्ये 'संविधान दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो.
26 नोव्हेंबर : जागतिक दुग्ध दिन (National Milk Day) :
भारताच्या श्वेत क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांचा जन्मदिन 26 नोव्हेंबर 2014 रोजी साजरा केला जातो. याच दिवशी राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताचे मिल्कमॅन आणि जगातील सर्वात मोठ्या कृषी कार्यक्रम ऑपरेशन फ्लडचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. कुरियन यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. अमूल या लोकप्रिय डेअरी ब्रँडच्या स्थापनेत आणि यशामध्ये डॉ. कुरियन यांचा मोलाचा वाटा होता. तसेच विविध शेतकरी आणि कामगारांनी चालवलेल्या अनेक संस्थांची त्यांनी स्थापना केली होती. जागतिक उत्पादनाच्या 22 टक्के उत्पादनासह भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. त्यानंतर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो.
27 नोव्हेंबर : विनायक चतुर्थी
विनायक चतुर्थी ही कृष्ण चतुर्थी ह्या तिथीला गणेशाची ‘विनायक’ ह्या नावाने पूजा करावी. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. श्री गणेशाची संकष्ट चतुर्थीला करतात तशी यथाविधी पूजा करावी. चंद्रोदयानंतर गणेशाला लाडवांचा नैवैद्य दाखवावा. पूजेनंतर लाडवांचेच दान द्यावे. सर्व दु:ख-संकटांचा परिहार होऊन सुखसमृद्धी लाभावी म्हणून हे व्रत करतात. युधिष्ठिराने हे व्रत केले होते.
28 नोव्हेंबर : महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी
जोतीराव गोविंदराव फुले महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना 1888 मध्ये महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय महात्मा (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.
महत्वाच्या बातम्या :