मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी पुन्हा एकदा चौदा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ठाणे आणि दिवा दरम्यान डाऊन जलद मार्गिकेवर असणार आहे. डाऊन फास्ट मार्गिकेवर मेगा ब्लॉकची सुरुवात शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजून वीस मिनिटांनी होईल, तर रविवारी दुपारी तीन वाजून वीस मिनिटंपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अप फास्ट मार्गिकेवर दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 वाजून 30 मिनिटांनी संपेल. या मेगा ब्लॉकच्या दरम्यान अप आणि डाऊन दिशेला धीम्यामार्गीकेवर लोकल धावतील. शनिवारी या ब्लॉगच्या आधी दादर येथून सुटणाऱ्या जलद लोकल आणि एक्सप्रेस अकरा वाजून 40 मिनिटांपासून ते रात्री दोन वाजेपर्यंत माटुंगा आणि कल्याण स्थानकाच्या दरम्यान डाऊन स्लो लाईन वरून धावतील. तर ब्लॉक सुरू झाल्यानंतर दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसएमटी इथून सुटणाऱ्या एक्सप्रेस, तसेच फास्ट लोकल या मुलुंड आणि कल्याणच्या दरम्यान डाऊन स्लो लाईनवर डायव्हर्ट करण्यात येतील. असं असलं तरी मेगा ब्लॉकच्या दरम्यान ठाणे स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर एक्सप्रेस आणि मेल गाड्या थांबणार नाहीत, असं मध्य रेल्वेनं सांगितलं आहे. 


रविवार, 23 जानेवारी रोजी मध्य रेल्वे ठाणे आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर 14 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक करणार आहे. या दरम्यान ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर 2 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक आहे. जुनी लाईन सध्याच्या फास्ट लाईनशी जोडण्यासाठी आणि ठाणे-दिवा 5व्या आणि 6व्या लाईनच्या संदर्भात क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी हे केले जात आहे.


मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी आतापर्यंत अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र अजूनही दोन मेगाब्लॉक शिल्लक असल्याचं मध्य रेल्वेने सांगितलं आहे. यापैकी पहिला मेगा ब्लॉक येत्या 22 आणि 23 जानेवारीला घेण्यात येईल. तर दुसरा मेगाब्लॉक हा 72 तासांचा असेल, जो फेब्रुवारीच्या चार ते सहा तारखेच्या दरम्यान घेण्यात येण्याची शक्यता आहे. या दोन मेगाब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यन्वित होईल, असंही एमआरव्हीसीनं सांगितलं आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha