एक्स्प्लोर

गुजरातमध्ये आचारसंहितेपूर्वी 12 दिवसांत मोदींच्या 12 घोषणा

जर हिमाचलच्या निवडणुकांची घोषणा 12 तारखेला झाली, तर गुजरातचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास 13 दिवसांचा विलंब का केला, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच बुधवार 25 ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र त्यापूर्वीच गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 12 घोषणांचा पाऊस पाडला आहे. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे, तर मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचं मतदान 9 नोव्हेंबरला होणार असून निकाल गुजरातसोबतच 18 डिसेंबरला लागणार आहेत. त्यामुळे जर हिमाचलच्या निवडणुकांची घोषणा 12 तारखेला झाली, तर गुजरातचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास 13 दिवसांचा विलंब का केला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यानच्या काळात गुजरातमध्ये काही प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन घेतलं. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीचा कालावधी वापरण्यासाठी गुजरात निवडणुकांच्या तारखा जाहीर करणं लांबवल्याचा आरोप होत आहे.

गुजरात निवडणूक 2017 : तारखा जाहीर, दोन टप्प्यात मतदान

'गुजरात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यास उशीर करण्यामागे कुठलीही मिलीभगत नाही' असं उत्तर मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी दिलं. गुजरात सरकारने पूरग्रस्तांना मदत जाहीर केली. मात्र निवडणूक कार्यक्रम आधी जाहीर झाला असता, तर याची पुनर्रचना केली असती, असंही ज्योतींनी सांगितलं. 229 जणांचा जीव घेणारी ही अभूतपूर्व आपत्ती असल्याचं त्यांनी सुचवलं. गुजरातमध्ये 12 दिवसात मोदींच्या 12 घोषणा 1. ठिबक सिंचन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना जीएसटीतून दिलासा 2. अधिकृत वैद्यकीय कार्यकर्त्यांना 50 टक्के वेतनवाढ 3. वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पालिका कर्मचारी आणि शिक्षकांना पगारवाढ 4. मोफत वैद्यकीय उपचारांसाठी पात्र ठरण्याच्या मर्यादेत वाढ 5. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज 6. पाटीदार आरक्षण आंदोलक आणि सानंद शेतकऱ्यांवरील केस मागे 7. सफाई कर्मचाऱ्यांना कायमचं अपंगत्व किंवा मृत्यू आल्यास कुटुंबीयांना नोकरी 8. सहाय्यक इलेक्ट्रिशियन्सना वेतनवाढ 9. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि निश्चित वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम भत्ता 10. खाजगी तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना टोलमाफी 11. दहा वर्षांची सेवा दिलेल्या शिक्षकांना नियमित केलं 12. अहमदाबाद मेट्रोची फेज 1 2020 पूर्वी पूर्ण होणार नसतानाही दुसऱ्या फेजसाठी फंडिंग

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget