एक्स्प्लोर

'मी, माझं, मला' म्हणणाऱ्या मोदींनी 'या' 10 प्रश्नांची उत्तर द्यावी : काँग्रेस

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधानांची मुलाखत 'मी, मला, माझे' या तीन मुद्द्यांभोवती फिरत होती. मोदींनी इतकी मोठी मुलाखत देण्यापेक्षा आमच्या 10 प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आवाहनही सुरजेवाला यांनी मोदींना केले आहे.

नवी दिल्ली : खूप मोठ्या कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीवरुन काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. मोदींच्या मुलाखतीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधानांची मुलाखत 'मी, मला, माझे' या तीन मुद्द्यांभोवती फिरत होती. मोदींनी इतकी मोठी मुलाखत देण्यापेक्षा आमच्या 10 प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आवाहनही सुरजेवाला यांनी मोदींना केले आहे. राफेल प्रकरण, देशाची सुरक्षा आणि देशातल्या वाढत्या महागाईवरुन काँग्रेस सातत्याने मोदींना लक्ष्य करत आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जे आरोप केले त्या आरोपांबाबत मोदींनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा, अशी मागणीदेखील काँग्रेसने केली. त्यानंतर आज पंतप्रधानांनी जाहीर मुलाखत देऊन विरोधकांना उत्तर दिले. परंतु मोदींनी दिलेल्या 95 मिनिटांच्या मुलाखतीवर काँग्रेस समाधानी नाही. त्यामधल्या कोणत्याही उत्तरावर समाधानी नसलेल्या काँग्रेसने मोदींना 10 प्रश्न विचारले आहेत. मोदींनी या 10 प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन काँग्रेसने केले आहे. काँग्रेसचे 10 प्रश्न
  1. नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये केव्हा जमा होणार?
  2. 100 दिवसांमध्ये देशात येणारे 80 लाख कोटी रुपये कधी येणार?
  3. 9 कोटी रोजगार कधी येणार?
  4. नोटबंदी आणि जीएसटीमुळे व्यापार उध्वस्त का केले?
  5. शेतमालावर 50 टक्के नफा मिळणार होता, परंतु सध्या खर्च केलेले पैसेदेखील का मिळत नाहीत?
  6. जीएसटीमुळे लहान व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान का केले?
  7. राष्ट्रीय सुरक्षेचे काय झाले? (काश्मीरमध्ये 428 आणि नक्षलवादी हल्ल्यात 248 जवान शहीद झाले)
  8. देशातील भ्रष्टाचाराबाबत मोदी काय बोलणार?
  9. राफेलबाबत मोदी उत्तरं कधी देणार?
  10. गंगा नदी अजून साफ का झाली नाही? देशात 100 स्मार्ट शहरं का तयार झाली नाहीत?

महत्त्वाच्या बातम्या

Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget