एक्स्प्लोर

सायकलने प्रवास करणारे 'ओदिशाचे मोदी' प्रतापचंद्र सारंगी मंत्रिमंडळात

अतिशय साध्या राहणीमानामुळे प्रतापचंद्र सारंगी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर वायरल झाले होते. आता, सारंगी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे

मुंबई : 'ओदिशाचे मोदी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रतापचंद्र सारंगी यांनी नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली. अतिशय साध्या राहणीमानामुळे सारंगी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर वायरल झाले होते. आता, सारंगी यांना मंत्रिमंडळात सहभागी करत मोदींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 65 वर्षांचे प्रताप सारंगी हे ओदिशाच्या बालासोरमधून भाजपच्या तिकीटावर खासदार झाले आहेत. यापूर्वी 2004 आणि 2009 मध्ये ते निलगिरीतून आमदार झाले होते. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यंदा बिजू जनता दलाचे कोट्यधीश उमेदवार रवींद्रकुमार जेना यांचा पराभव करत सारंगी ओदिशातील बालासोरमधून निवडून आले. दांडग्या जनसंपर्काच्या बळावर सारंगींनी विजयाला गवसणी घातली. सारंगींनी स्वतःला समाजकार्यामध्ये झोकून दिलं आहे. सारंगी आजही शेती करतात आणि सायकलवरुन प्रवास करतात. सारंगी यांनी घरादाराचा त्याग करण्याचा निश्चय केला होता, मात्र आईची हाक ऐकून त्यांनी निर्णय बदलला. अविवाहित असलेल्या सारंगींनी बालासोर आणि मयुरभंज या आदिवासी भागात अनेक शाळा सुरु केल्या आहेत. सायकलने प्रवास करणारे 'ओदिशाचे मोदी' प्रतापचंद्र सारंगी मंत्रिमंडळात सारंगींच्या 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' या तत्त्वाची मोदींना भुरळ पडली. 2017 मध्ये ओदिशा दौऱ्यावर असताना मोदींनी केंद्रीय मंत्र्यांपेक्षा सारंगींची आत्मीयतेने चौकशी केली होती. आता सारंगी यांना कोणत्या मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाते, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget