एक्स्प्लोर

राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट?

अहमदाबाद/मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राजकीय हालचाली गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यातच नारायण राणे काल अहमदाबादमध्ये होते. विशेष म्हणजे याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सुद्धा अहमदाबादमध्येच होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. नारायण राणे यांची मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी भेट झाली का, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. मात्र, नारायण राणे अहमदाबादेतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. नारायण राणे मुंबईला रवाना होत असताना विमानतळावर एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, राणेंनी माध्यमांशी बोलण्याचं टाळलं. राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी सुमारे एक तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नारायण राणे काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह हे अहमदाबादेत असतानाच नारायण राणेही अहमदाबादमध्येच असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे. नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास – 1968 – वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश – 1968 – शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी – 1985 ते 1990- या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले – 1990-95 – नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर – 1991 – छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले – 1990-95 – याच काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद – 1996-99 – युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान – 1999 – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड – 2005 – शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद. मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली – 2005 – शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश -2005 – शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी – 2005 – आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड – 2007 – काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड – 2009 – विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण – 2014 – लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा – 2014 – मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा

संबंधित बातम्या :

नारायण राणे यांचा राजकीय प्रवास

नारायण राणे पुन्हा शिवसेनेत परतणार?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget