Assam News : रविवारी, आसामच्या नागाव येथून एका व्यक्तीला नुक्कड नाटकात भगवान शिवाची वेशभूषा करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्याविरूद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. आता त्याला या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असलेल्या इतर दोन जणांसह न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती पीएस प्रभारी मनोज राजवंशी यांनी दिली आहे. 


"भगवान शिवाची वेशभूषा केलेल्या या आरोपीला अटक करण्यात आली आहे, आणि त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. इतर दोघे ज्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे, त्यांचा शोध अजूनही सुरु आहे." असे पीएस प्रभारी मनोज राजवंशी यांनी सांगितले.






 


महागाई यांसारख्या सर्वसामान्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी नुक्कड नाटक सादर करण्यात आले.


लोकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा स्टंट मारला. परंतु, बर्याच लोकांना हे फारसे पटले नाही. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांसारख्या संघटनांनी अभिनेत्याविरुद्ध खटले दाखल केले आणि आरोप केला की, या दोघांनी हिंदू देवता आणि देवीचे चित्रण 'वाईट प्रकारे केले आहे आणि तसे करण्याचे स्वातंत्र्य नाही'.


“आम्ही असे कृत्य खपवून घेणार नाही. आम्ही उदारमतवादी आहोत पण त्याचा फायदा कोणालाही घेऊ देत नाही. आम्हाला निषेधाविरुद्ध काहीही म्हणायचे नाही पण आमच्या देव आणि देवीचे नाव का वापरायचे किंवा त्यांना सामील करून त्यांचा अपमान का करायचा,” असा दावा प्रदिप शर्मा, विश्व हिंदू परिषद, नागाव, सचिव यांनी नोंदवला आहे. 


महत्वाच्या बातम्या :