Bakri Eid 2022 : आज देशात बकरी ईद (Bakri Eid 2022) साजरी केली जात आहे. सोशल मीडियावरुन अनेक लोक बकरी ईदच्या शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) आणि महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी देशातील नागरिकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'ईद मुबारक, ईदच्या शुभेच्छा. हा सण आपल्याला मानवतेसाठी कल्याण आणि समृद्धीची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरणा देईल. '
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ट्वीट
रामनाथ कोविंद यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'ईदच्या सर्व देशवासियांना, विशेषत: आपल्या मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा. ईद हा सण त्याग आणि मानवसेवेचे प्रतीक आहे. या निमित्ताने आपण मानवजातीच्या सेवेत स्वतःला झोकून देऊन राष्ट्राच्या समृद्धीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करूया.'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा
त्याग, समर्पणासाठी ओळखला जाणारा सण ‘बकरी ईद’ अर्थ 'ईद-उल- अजहा' निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'बकरी ईद' सणाकडून प्रेरणा घेऊन समाजातील बंधुता, एकमेकांप्रती आदर, एकतेची भावना वाढीस लागावी, हीच अपेक्षा. त्याग, समर्पणातूनच सशक्त अशा समाजाची उभारणी होते, त्यासाठी आपण सर्व एकजुटीने प्रयत्न करूया, हीच मनोकामना आणि याच शुभेच्छा! असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट शेअर करुन ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा: