Nagaland Election Result 2023 :  नागालँड विधानसभा निवडणुकीचा (Nagaland Election) जवळपास सर्व निकाल जाहीर झाला आहे. नागालँडमध्ये भाजप (BJP) आणि नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष हे बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहेत. विधानसभेच्या 60 जागांपैकी 59 जागांसाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मतदान झाले होते. यातील अनेक जागांवर करोडपती उमेदवार उभे राहिले होते. त्यातचीलच  डॉ. सुखतो ए सेमा (  Dr. Sukhato A Sema ) हे सर्वात जास्त श्रीमंत आहेत. 


Dr. Sukhato A Sema : डॉ. सुखतो ए सेमा 160 कोटींच्या  मालमत्तेचे मालक


डॉ. सुखतो ए सेमा हे नागालँड विधानसभा लढवणारे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. डॉ. सुखतो ए सेमा यांच्याकडे  तब्बल 1 अब्जांपेक्षा जास्त संपत्ती आहे. ADR अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. "डॉ. सुखातो ए. सेमा हे या विधानसभेच्या उमेदवारांपैकी श्रीमंत उमेदवारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. 


सुखातो हे लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) उमेदवार आहेत, ज्यांनी नागालँडमधील पूघोबोटो (पुघोबोटो/एसटी), झुन्हेबोटो जागेवरून निवडणूक लढवली होती. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) उमेदवार होण्यापूर्वी ते भाजपमध्ये होते. त्यांनी पक्ष बदला आणि विजय देखील खेचून आणला. 


Dr. Sukhato A Sema डॉ. सुखातो ए सेमा हे 65 वर्षांचे 


निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचा पेशा डॉक्टर आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर, आणि वय 65 वर्षे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 160.2 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये 11.3 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 148.9 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 


दुसऱ्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचाही विजय  


NDPP मुख्यमंत्री नेफिउ रिओ हे नागालँडच्या श्रीमंत उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 46 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांनी देखील ही निवडणूक जिंकली आहे. त्यांच्यापाठोपाठ 34 कोटींची संपत्ती असलेले भाजपचे ए.आर. काहुली सेमा हे देखील श्रीमंत उमेदवारांच्या यादीत आहेत.  


83 टक्क्यांहून अधिक मतदान


नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी 83 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि मतदान शांततेत पार पडले. 60 सदस्यीय नागालँड विधानसभेत 59 जागांवर उमेदवार उभे होते. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार आणि विद्यमान आमदार काझेटो किनीमी यांनी झुन्हेबोटो जिल्ह्यातील अकुलुतो मतदारसंघातून बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. 


महत्वाच्या बातम्या 


Hekani Jakhalu: नागालँडला मिळाली पहिली महिला आमदार; भलंमोठं कर्ज, सहा गाड्या आणि पेशाने वकील असणाऱ्या हेकानी जाखलू कोण आहेत?