एक्स्प्लोर

रोहित शेखर तिवारींचा मृत्यू अनैसर्गिक, पोस्टमार्टम रिपोर्टनंतर हत्येचा गुन्हा दाखल

रोहित शेखर यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर आज शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारींच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता त्यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर आज शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये रोहित शेखर तिवारींचा मृत्यू गुदमरुन झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी हत्येच्या संशयातून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रोहित शेखर तिवारींच्या मृत्यूप्रकरणी आधी दिल्ली पोलिसांकडे तपास सोपवण्यात आला होता. मात्र आता हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलं आहे. क्राईम ब्रांचची टीम आणि सीएफएसएलने रोहित शेखर यांच्या घरी तपास करत पुरावेही गोळा केले. रोहित शेखर यांच्या पोस्टमार्टममध्ये त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचं निष्पन्न झालं आहे, ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अज्ञाताविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित शेखर तिवारी 15 एप्रिल रोजी बाहेरुन घरी परतले. घरातील नोकरांचा जबाब आणि सीसीटीव्ही फूटेजवरुन रोहित मद्यधुंद अवस्थेत घरी परतल्याचं स्पष्ट झालं आहे. घरी परतताच ते आपल्या खोलीत जाऊन झोपले. 16 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रोहित शेखर यांचा मृतदेह संशयास्पद स्वरुपात सापडला होता. दरम्यानच्या काळात रोहित यांना कुणीही उठवण्याचा प्रयत्न केला नाही. रोहित शेखर यांच्या हृदयाची क्रिया बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती. रोहित यांना मंगळवारी 16 एप्रिल रोजी संध्याकाळी दिल्लीच्या साकेत मॅक्स रुग्णालयात मृतावस्थेत आणलं होतं. डॉक्टरांनी 5.50 वाजता त्यांना मृत घोषित केलं. कोर्टात खटला, 6 वर्षांनी अधिकार मिळाला मागील वर्षी 18 ऑक्टोबर 2018 रोजी एनडी तिवारी यांचं निधन झालं होतं. 2008 मध्ये रोहित शेखरने कोर्टात खटला दाखल करुन एनडी तिवारीच आपले बायोलॉजिकल वडील असल्याचा दावा केला होता. यानंतर 2011 मध्ये तिवारी यांना डीएनए तपासणीसाठी रक्त द्यावं लागलं होतं. रक्त तपासणीचा अहवाल सार्वजनिक न करण्याची विनंती एनडी तिवारींनी कोर्टात केली होती. परंतु कोर्टाने ही विनंती फेटाळली. अखेर डीएनए रिपोर्टमध्ये एनडी तिवारीच रोहित शेखरचे बायोलॉजिकल वडील असल्याचं समोर आलं. मोठ्या कायदेशीर लढाईनंतर एनडी तिवारींनी राहुल शेअर आपला मुलगा असल्याचं मान्य केलं होतं. यानंतर तिवारी यांनी 2014 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी लग्न केलं. कोर्टातील वाद संपल्यानंतर रोहित वडिलांसोबतच राहत होता. रोहित शेखर 2017 मध्ये भाजपमध्ये सामील झाला होता. एक वर्षापूर्वी त्याने अपूर्वा शुक्लासोबत लग्न केलं होतं. मूळची इंदूरची असलेली अपूर्वा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करते. रोहितच्या साखरपुड्याच्या वेळी एनडी तिवारी यांच्यावर मॅक्स रुग्णालयातच उपचार सुरु होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget