Mundra Port : अदानी समूहाकडे मालकी असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरुन तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानवरुन दोन कंटेनरच्या माध्यमातून आलेलं हिरॉईन (ड्रग्ज) हे तब्बल 15 हजार कोटी किंमतीचे असल्याचं सांगितलं जातंय. ही कारवाई केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या Directorate of Revenue Intelligence (DRI) आणि कस्टम विभागाच्या वतीनं 15 सप्टेंबरला करण्यात आली आहे. 


डायरेक्टोरेट ऑफ रिव्ह्येन्यू इंटेलिजन्सला (DRI) मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी गुजरातमधील कच्छ भागातील मुंद्रा या पोर्टवरुन 2,988 किलो अफगाणी हिरॉईन जप्त केलं. दोन कन्टेनरमधून भरुन आलेल्या या कन्टेनरमधून टॅल्कम पावडर आणण्यात येत आहे अशा प्रकारची कागदपत्रे रंगवण्यात आली होती. हे दोन्ही कन्टेनर अफगाणिस्तानच्या हसन हुसेन लिमिटेड या कंपनीने निर्यात केले असून ते आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका कंपनीने मागवल्याची माहिती समोर आली आहे. 


अदानी समूहाचे स्पष्टीकरण
एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्यानंतर या पोर्टची मालकी असलेल्या अदानी समूहाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अदानी समूहाच्या प्रवक्त्याने यावर एक निवदेन प्रसिद्ध केलं असून त्यात म्हटलं आहे की, "या कारवाईबद्दल आपण डीआरआय आणि कस्टम विभागाचे अभिनंदन करतो. अदानी समूहाकडे केवळ या पोर्टच्या ऑपरेटिंगचे अधिकार आहेत. या पोर्टवर आलेल्या मालाच्या तपासणीचे कोणतेही अधिकार अदानी समूहाकडे नाहीत."


अलिकडच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडल्याची ही पहिलीच घटना आहे. अफगाणिस्तावर तालिबानने कब्जा केल्यानंतर त्या ठिकाणाहून होणाऱ्या ड्रग्जच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. भारतातही पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता कस्टम विभाग आणि ड्रग्ज विरोधी पथकं अलर्ट झाली आहेत. 


महत्वाच्या बातम्या :