मुंबई : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने अंधेरीत एमडीएमएच्या एक्सटीसी पिल्सचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव दीबा ओलिवर असं असून तो कॅमेरुन नागरिक आहे. महत्वाचं म्हणजे अटक करण्यात आलेली व्यक्ती ही दुबईमध्ये प्रोफेसर असून भारतात ड्रग्ज पेडलर म्हणून काम करत आहे अशी माहिती एनसीबीने दिली आहे. 


पैशांसाठी ड्रग पेडलरचे काम
एनसीबीच्या समीर वानखेडे यांनी सांगितलं की, ओलिवर हा सुरुवातीला मेडिकल व्हिसाच्या माध्यमातून भारतात आला होता. त्याला क्षयरोगाचा त्रास असल्याने त्याच्या उपचारासाठी तो मुंबईत आला. या दरम्यान त्याला पैशाची गरज होती. त्याचवेळी त्याची ओळख एका ड्रग पेडलरसोबत झाली. कमिशनच्या हव्यासापोटी ओलिवर ड्रग पेडलरचे काम करू लागला.


आरोपीकडून 20 एमडीएमए जप्त
दुबईत प्रोफेसर असलेल्या या आरोपीकडून 20 एमडीएमए जप्त करण्यात आल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. ड्रग्जची ऑर्डर मिळाल्यानंतर तो त्याच्या सोर्सकडून ड्रग्ज मागवायचा आणि ऑटो किंवा टॅक्सीच्या माध्यमातून त्याची डिलीव्हरी करायचा. या आरोपीसोबत मोहम्मद इमरान अंसारी नावाच्या आणखी एका ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आली आहे. एनसीबी अन्सारीच्या घरी गेल्यानंतर अन्सारीने त्याच्याकडील ड्रग्ज खिडकीतून खाली फेकून दिले. या कारवाईत एनसीबीने अन्सारीच्या घरातून साडे नऊ लाख रुपये जप्त केले. 


त्या आधी एक दिवस एनसीबीने आणखी एका प्रकरणात सर्फराज कुरेशी या अग्रिपाडा येथील युवकाला 165 ग्रॅम एमडी सोबत अटक केली होती. आरोपीच्या घराचा तपास केला असता त्याच्याकडे 2.15 लाख रुपयांची कॅश मिळाली. ही रक्कम एनसीबीने जप्त केली आहे. 


महत्वाच्या बातम्या :