एक्स्प्लोर

फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप

महिलेच्या तक्रारीनुसार, "आयएएस अधिकाऱ्यासोबत तिची फेसबुकवर मैत्री झाली होती. सुरुवातीला सोशल मीडियावर त्यांचं चॅटिंग सुरु होतं. त्यानंतर ते फोनवर बोलू लागले. लवकरच ते एकमेकांच्या अधिक जवळ आले."

कोलकाता : मुंबईत राहणाऱ्या महिलेने एका आयएएस अधिकाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ही महिला सध्या आर्थिक मंत्रालयात कार्यरत आहे. तर आयएएस अधिकारी कोलकातामध्ये तैनात आहे. "अधिकाऱ्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर फसवणूक केली आणि त्यानंतर मला सोडलं," असा आरोप महिलेने केला आहे. या महिलेने मंगळवारी सॉल्ट लेकच्या महिला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारावर, पोलिसांनी सॉल्ट लेक कोर्टाकडून न्यायालयीन जबाब नोंदवण्याची परवानगी मागितली आहे. न्यायालयाच्या आदेशावर महिलेने बुधवारी कलम 164 सीआरपीसी अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला. फेसबुकवर मैत्री महिलेच्या तक्रारीनुसार, "आयएएस अधिकाऱ्यासोबत तिची फेसबुकवर मैत्री झाली होती. सुरुवातीला सोशल मीडियावर त्यांचं चॅटिंग सुरु होतं. त्यानंतर ते फोनवर बोलू लागले. लवकरच ते एकमेकांच्या अधिक जवळ आले." यादरम्यान महिला त्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी कोलकातालाही गेली होती. "कोलकाता भेटीवेळीच आयएएस अधिकारी तिला केबी ब्लॉक अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला. यावेळी तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स केलं होतं आणि त्याने परिस्थितीचा फायदा घेतला," असंही तिने सांगितलं. टाळायला सुरुवात केल्याने तक्रार "मला त्या आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध ठेवायचे होते, त्यामुळे तेव्हा तक्रार केली नाही," असं महिलेने सांगितलं. "पण आपल्याबाबत अधिकाऱ्याचे वेगळेच विचार होते. अधिकाऱ्याने महिलेला टाळायला सुरुवात केली. तसंच आपला कॉलही रिसिव्ह करत नसे. अधिकाऱ्याच्या या वर्तणुकीनंतर आपलं लैंगिक शोषण झाल्याचं समजल्यानंतर औपचारिक तक्रार दाखल केली," असा दावा महिलेने केला आहे. प्रकरणाचा तपास सुरु लवकरच आरोपी अधिकाऱ्याची चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "त्या व्यक्तीची चौकशी केली जाईल. या प्रकरणात आधीच तक्रार दाखल केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरु आहे." "तक्रारीत केलेल्या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी फेसबुकवर झालेल्या बातचीतद्वारेही माहिती गोळा केली जात आहे," असंही पोलिसांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
India Rain Deficit : 'एल निनो'चा प्रभाव, राज्यासह देशात संकाटाचे ढग गडद; जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; भारतात मान्सूनच्या पावसाची तूट 40 टक्क्यांवर, IMD चा अंदाज काय?
'एल निनो'चा प्रभाव, राज्यासह देशात संकाटाचे ढग गडद; जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; भारतात मान्सूनच्या पावसाची तूट 40 टक्क्यांवर, IMD चा अंदाज काय?
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget