Mulayam Singh Yadav Health Update: गेल्या सात दिवसापांसून समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकती नाजूक असल्याची माहिती हॉस्पीटलच्या प्रशासनानं दिली आहे. सात दिवसांनंतर मुलायम सिंह यादव याच्याबाबत हॉस्पिटलमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुलायम सिंह यांची ऑक्सीजन लेवल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनानं दिली आहे. पण मुलायम सिंह यांची प्रकृती चिंताजनकच असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनानं दिली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्यावर हरियाणातील मेदांता हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये गेल्या सात दिवसापासून उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दिलासादायक बातमी म्हणजे त्यांचा ब्लड प्रेशर नियंत्रणात आला असून, ऑक्सीजन लेवलही नियंत्रणात आली आहे. मात्र, त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. दरम्यान, मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी प्रत्येक पक्षातील अनेक बडे नेते मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरही (Manohar Lal Khattar) यांनी देखील त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे.
मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक नेते रुग्णालयात
मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शुक्रवारी रुग्णालयात अनेक नेते आले होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सुब्रत रॉय, काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी, बहुजन समाजवादी पार्टीचे नेते सतीश चंद्र मिश्रा, माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला, भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद आणि काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम हे नेते मुलायम सिंह यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.
मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून
दरम्यान, समाजवादी पार्टीने शुक्रवारी ट्विटवरुन मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, मेदांता हॉस्पिटलने शुक्रवारी जारी केलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सतत लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे, 82 वर्षीय मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने 2 ऑक्टोबर रोजी त्यांना मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या: