Foreign Exchange Recline : देशाच्या परकीय चलनाच्या (Foreign Exchange) साठ्यात सलग नवव्या आठवड्यात घट झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI - Reserve Bank of India) आकडेवारीत जाहीर करत यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात 4.854 अब्जने घसरून 532.664 अब्ज झाले.
23 सप्टेंबर रोजी संपलेल्या मागील आठवड्यात परकीय चलन साठा 8.134 अब्ज डॉलरने घसरून 537.518 अब्ज इतका झाला होता. 16 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात हाच साठा 5.219 अब्ज डॉलरने घसरून 545.652 अब्ज झाला. ऑक्टोबर 2021 मध्ये देशाच्या परकीय चलनाचा साठा 645 अब्ज इतका सर्वकालीन उच्चांक गाठला होता. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
आरबीआयने जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यातील ही घसरण मुख्यत्वे विदेशी चलन मालमत्तेमध्ये (Foreign Currency Assets) घट झाल्यामुळे झाली, जी मालमत्ता एकूण चलन साठ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. याबाबत माहिती देताना रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे की, अहवालाच्या आठवड्यात भारताचा विदेशी चलन मालमत्ता (FCA ) 4.406 अब्ज डॉलरने घसरून 472.807 अब्ज झाला आहे. डॉलरमध्ये नामांकित, FCAs मध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यात वाढ किंवा घट होण्याचा परिणाम देखील समाविष्ट असतो.
सोन्याचा साठाही कमी झाला
याशिवाय गेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 281 दशलक्षने घसरून 37605 अब्ज झालं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये देशाचा SDR (स्पेशल ड्रॉइंग राइट्स) 167 दशलक्षने घसरून 17.427 अब्ज झाला. रिपोर्टिंग आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील देशाची राखीव स्थिती 4.826 US अब्ज डॉलरवर अपरिवर्तित राहिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या