एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?
![भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती? Mukesh Ambani Keeps Pay Capped At Rs15 Crore For 9th Year In A Row Latest Update भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/28153649/Mukesh-Ambani.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा पगार गेल्या नऊ वर्षांपासून बदललेला नाही. 2008 पासून अंबानी वार्षिक 15 कोटी रुपये पगार घेतात.
मुकेश अंबानी हे जगातील विसाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 31.3 बिलियन डॉलर म्हणजेच 2 लाख 2 हजार 230 कोटी रुपये इतकी त्यांची एकूण संपत्ती आहे.
2008-09 या आर्थिक वर्षापासून अंबानींनी आपला भत्ते, कमिशन कमी करुन पगार 15 कोटी रुपयांवर रोखला आहे. त्यापूर्वी त्यांचा पगार वार्षिक 24 कोटी रुपये होता.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना 38.75 कोटी रुपये वेतन मंजूर करण्यात आले आहे, मात्र व्यवस्थापकीय पातळीवर आदर्श उदाहरण ठेवण्यासाठी मुकेश अंबानींनी 15 कोटी रुपये पगार घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं रिलायन्सच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे.
2007-08 मध्ये 44 कोटी रुपयांचं पॅकेज असलेले मुकेश अंबानी भारतातील हायेस्ट पेड एक्झिक्युटिव्ह होते.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion