एक्स्प्लोर

शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे

असल्या माणसांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही, त्यानी आता जरी माफी मागितली असली तरी नुसत्या माफीनं खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणी अपशब्द काढले, तर त्याला पहिल्यांदा महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे, हद्दपार जर त्यांनी केलं नाही तर आम्ही करु, अशा तिखट शब्दांत खासदार युवराज संभाजीराजे यांनी अहमदनगरच्या छिंदम प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. राजधानी दिल्लीत पहिल्यांदाच जी भव्य शिवजयंती साजरी होणार आहे, त्याच्या तयारीनिमित्त ते एबीपी माझाशी बोलते होते. महाराष्ट्रासह दिल्लीत शिवजयंतीचा उत्साह असताना अशा पद्धतीचं वक्तव्य सत्ताधारी पक्षाचे उपमहापौर करतात, तुम्ही आता भाजपचे सहयोगी खासदार आहात, त्यावर तुमची प्रतिक्रिया आहे असा प्रश्न विचारला असता, संभाजीराजेंनी माझ्यासाठी छत्रपती शिवराय हा विषय पक्षाच्या पलीकडचा आहे असं सांगत वरील प्रतिक्रिया दिलीय. असल्या माणसांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही, त्यानी आता जरी माफी मागितली असली तरी नुसत्या माफीनं खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला भाजपनं उपहामौरपदावरुन निलंबित केलं आहे. त्याची भाजपमधूनही हकालपट्टी करण्यात आल्याचंही सांगितलं जातंय. संभाजीराजे हे राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित खासदार आहेत. राज्यसभेत भाजपचे सहयोगी सदस्यत्व त्यांनी स्वीकारलंय. काय आहे प्रकरण? अहमदनगरचे निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमची कथित क्लिप समोर आली आहे. एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना छिंदमने फोन केला, यावेळी बोलताना उपमहापौरांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार युनियनकडे तक्रारही दाखल केली. छिंदमवर भाजपची कारवाई “शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करतो. छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.” अशी माहिती भाजपचे नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी दिली. संबंधित बातम्या : श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
Karnataka Politics : मोठी बातमी : डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर लिंगायत, दलित, OBC आणि अन्य असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला
मोठी बातमी : डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर लिंगायत, दलित, OBC आणि अन्य असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
मला फोनवरुन धमक्या, रुपाली चाकणकरांचा रोल करू नका; अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा
मला फोनवरुन धमक्या, रुपाली चाकणकरांचा रोल करू नका; अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
Embed widget