एक्स्प्लोर

संभाजीराजे छत्रपतींना केंद्रात मंत्रिपद मिळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संभाजीराजे छत्रपतीही उपस्थित होते.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांच्या बैठकीला आज राष्ट्रपती नियुक्त कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही हजेरी लावली. संभाजीराजे हे राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार आहेत. पक्षाचं सदस्यत्व स्वीकारणं त्यांना बंधनकारक नसतं. संभाजीराजे हे आधी राष्ट्रवादी पक्षात होते, शिवाय ते राजघराण्यातले असल्यानं राष्ट्रपतींद्वारे निवड झाल्यानंतर ते काय करणार याबद्दल उत्सुकता होती. मात्र त्यांनी भाजपचं सहयोगी सदस्यत्व अखेर स्वीकारलेलं आहे. आजच्या मीटिंगला भाजप खासदारांसोबत तेही 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहचले. या उपस्थितीबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, “मी केवळ संसदेतच भाजपचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारलंय. अधिवेशन काळात दर मंगळवारी भाजपची संसदीय पक्षाची जी बैठक होते, त्याला मी जात नाही. तसं बंधनही माझ्यावर नाही. मागच्या अधिवेशनातही आपण पंतप्रधानांनी बोलावलेल्या भाजप खासदारांच्या बैठकीला हजर होतो”. छत्रपती संभाजीराजे यांच्याप्रमाणे डॉ. नरेंद्र जाधव हेही राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार आहेत. पण त्यांनी पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलेलं नाही. छत्रपती संभाजीराजे हे भाजप खासदारांच्या मांडीला मांडी लावून मोदींच्या दरबारात पोहचल्याची आज दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सहयोगी सदस्यत्व स्वीकारून संभाजीराजेंनी आपल्या मंत्रिपदाचा मार्गही मोकळा ठेवला आहे की काय असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय. संभाजीराजे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. शिवाय महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून मराठा मोर्चांचं वादळ सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंना संधी देण्याचा विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे. सहयोगी सदस्यत्व स्वीकारुन संभाजीराजेंनी एक पाऊल पुढे टाकलेलंच आहे, आता मंत्रिपद स्वीकारुन ते भाजपचा शिक्का स्वत:वर लावून घेणार का याची उत्सुकता आहे. संभाजीराजे काय म्हणाले? “संभाजीराजे हे राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत. खासदारकी स्वीकारल्यावर त्यांना  संसदेतलं पक्षाचं सदस्यत्व स्वीकारायचं की नाही याचा पर्याय खुला असतो . त्यामुळे संभाजीराजे काय करणार याची उत्सुकता होती. आजच्या बैठकीला त्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांना विचारलं असता, संभाजीराजे म्हणाले मी केवळ संसदेतच भाजपचं सदस्यत्व ( सहयोगी) स्वीकारलं आहे. दर मंगळवारी अधिवेशन काळात जी भाजपची संसदीय बैठक होते त्याला मी जात नाही, तसं बंधनही माझ्यावर नाही. मी खासदारकी कुणाकडे मागायला गेलो नव्हतो, पण ज्या मोदींनी आपली निवड केलीय त्यांच्याप्रती आदर म्हणून त्यांनी बोलावलेल्या या बैठकीला हजर राहिलो. मागच्या अधिवेशनातही पंतप्रधानांनी बोलावलेल्या अशा बैठकीला उपस्थित होतो”, असं संभाजीराजे म्हणाले. संबंधित बातम्या

पवारांच्या त्या वक्तव्याबाबत संभाजीराजे म्हणतात....

मी केवळ छत्रपतींचा सेवक, फडणवीसांचं पवारांना उत्तर 

मी कधीही सहज बोलत नाही : शरद पवार

महत्त्वाच्या बातम्या

Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget