एक्स्प्लोर

MP Plane Crash : विमान अपघातात बेळगावचे विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचा मृत्यू

MP Plane Crash: भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील मोरेना येथे शनिवारी सकाळच्या सुमारास सुखोई-20 आणि मिराज 2000 ही दोन विमानं कोसळली.

MP Plane Crash : वायू दलाची शान समजली जाणाऱ्या दोन लढाऊ विमानांमध्ये टक्कर झाली .नव्या दमाच्या पायलट्सचं ट्रेनिंग सुरु असताना हा अपघात झाला. या अपघातात एका पायलटवर काळाने घाला केला. बेळगावचे विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इतर दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

 हणमंतराव सारथी यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील रेवणसिद्द्पा सारथी हे सेनेमध्ये  कॅप्टन म्हणून निवृत्त झाले आहेत. तर त्यांचा एक भाऊ रवी हे सुद्धा हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावत आहेत. हणमंतराव यांचे पोस्टिंग सध्या मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे होते. दैनंदिन सरावासाठी त्यांनी ग्वाल्हेर येथून उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या विमानाची आणि अन्य एका विमानाची आकाशात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मागे आईवडील, पत्नी, दोन मुले, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांचा पार्थिव आज  हवाई दलाच्या खास विमानाने बेळगावात आणणार आहेत. सारथी यांच्यवर  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील मोरेना येथे शनिवारी सकाळच्या सुमारास सुखोई-20 आणि मिराज 2000 ही दोन विमानं कोसळली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. अपघातावेळी सुखोई-30 मध्ये दोन वैमानिक आणि मिराज 2000 मध्ये एक वैमानिक होता. यातील मिराजमधील वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. तर, सुखोई-30 मधील दोन्ही वैमानिक गंभीर जखमी आहेत.  सुखोई-30 आणि मिराज 2000  ही दोन्ही विमानं आकाशातच धडकली आणि आकाशात स्फोट झाला. याबाबत हवाई दलाकडून या दुर्घटनेची सखोल चौकशी होणार आहे  तसेच, या अपघाताची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान यांनी हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे.

मुरैनाचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?

मुरैनाचे जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांनी सांगितले की, "दोन्ही विमानांचे अवशेष जिल्ह्यातील पहाडगड भागात पडले. मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील भरतपूर भागातही काही अवशेष पडले आहेत." दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना हवाई दलाच्या प्रमुखांनी या अपघाताबाबत माहिती दिली. त्यांनी पायलटांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget