नवी दिल्ली : देशातील 11 राज्यांमधील 58 विधानसभा जागा आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी पोट निवडणूका घेण्यात आल्या. आज बिहार विधानसभा निवडणुकांसोबतच या पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या 28 जागांसाठी घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीचा निकास मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारचं भविष्य ठरवणार आहेत. तर मध्य प्रदेशातील 25 जागांवर निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. सध्याच्या निवडणूकीसाठी पूर्वीचे काँग्रेस आमदार आता भाजपकडून निवडणूक लढत आहेत. तर उरलेल्या तीन जागांवर निवडून आलेल्या आमदारांचं निधन झाल्यामुळे त्या ठिकाणी पोट निवडणूका घेण्यात येत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 230 सदस्यांच्या विधानसभेच्या 28 जागांसाठी एकत्रच पोटनिवडणूका घेतल्या जात आहेत. या निवडणुकांमध्ये मध्यप्रदेशातील 12 मंत्र्यांसह एकूण 355 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी भाजपकडे 107 आमदार आहेत. तर त्यांना बहुमत मिळवण्यासाठी आणखी नऊ जागांची गरज आहे. तर काँग्रेसकडे एकूण 87 आमदारांच पाठबळ आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेत बहुमत असणारा भाजप सात जागांवर पोट निवडणूकीच प्रतिष्ठेची लढाई लढत आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यानंतर आठ जागांवर पोट निवडणुका घेण्यात येणार आहेत. यांपैकी 5 आमदार भाजपच्या तिकीटावर पुन्हा निवडणूक लढत आहेत. याव्यतिरिक्त छत्तीसगढ (एक जागा), हरियाणा (एका जागा), झारखंड (दोन जागा), कर्नाटक (दोन जागा), नागालँड (दोन जागा), ओदिशा (दोन जागा) आणि तेलंगणा (एक जागा) वर पोट निवडणूक लढत आहे. 7 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील 4 आणि बिहार वाल्मिकी नगर लोकसभा जागांवर मतदान पार पडलं. या सर्व जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं होतं.
पाहा व्हिडीओ : Bihar Election Results 2020 | बिहारचा 'बाहुबली' कोण? नितीश कुमार की तेजस्वी यादव?
मध्य प्रदेश : जोरा, सुमौली, मुरेना, दिमनी, अंबाह, मेहगांव, गोहद, ग्वालियर, ग्वालियर पूर्व, डबरा, भांडेर, करेडा, पोहरी, बमोरी, अशोक नगर, मुंगोली, सुरखी, मल्हारा, अनूपपुर, सांची, बियोरा, आगर, हाटपिपलिया, मंधाता, नेपानगर, बदनवर, सांवेर आणि सुवासरा
उत्तर प्रदेश : उन्नाव की बांगरमऊ, अमरोहा की नोगांव सादात, फिरोजाबाद मधील टूंडला, बुलन्दशहर की सदर, जौनपूर मधील मल्हनी, कानपुर देहात मधील घाटमपूर आणि देवरिया सदर. बांगरमऊ जागेसाठी भाजप आमदार कुलदीप सेंगर यांचं सदस्यत्वाचा कालावधी संपल्यानंतर येथे पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
गुजरात : अब्दसा, लिमडी, मोरबी, धारी, गढा (एसटी), कर्जन, डांग्स (एसटी) आणि कपराडा (एसटी)
कर्नाटक : सिरा, राजा राजेश्वरी नगर
ओडिशा : बालासोर, तीर्थोल
झारखंड : दुमका, बेरमो
नगालँड : दक्षिणी अंगामी- I, पुंग्रो-किफिर
तेलंगाना : दुब्बाका
छत्तीसगढ : मरवाही
हरियाणा : बडोदा
मणिपूर : थुबल जिल्ह्यातील लिलोंग आणि वांगजिंग-टेन्था, कंगपोकपी मधील सेतु आणि इम्फाल वेस्ट मधील वंगोई विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे.
बिहारमधील वाल्मिकी नगर येथील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :