मुंबई : कोरोना व्हायरसचं निदान लवकरात लवकर व्हावं यासाठी टाटा ग्रुपच्या हेल्थकेअर युनिटच्या टाटा मेडिकल अँड डायग्रोनसिसने कोविड- 19 टेस्ट किटची निर्मिती केली आहे. कंपनीने हे किट लाँच केलं असून कोविड-19 टेस्ट किट्स डिसेंबर महिन्यात देशभरातील लॅबमध्ये उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती सीईओ गिरीश कृष्णमूर्ति यांनी दिली आहे. टाटाच्या टेस्ट किटला सरकारने मान्यता दिली असून ती केवळ 90 मिनिटांत कोरोना व्हायरच्या टेस्टचा रिपोर्ट कळणार आहे.


चेन्नईतील टाटाच्या प्लांटमध्ये ही टेस्ट किट बनवली जाणार आहेत. या प्लांटमध्ये महिन्यात 10 लाख किट तयार करण्याची क्षमता आहे. टाटाने बनवलेल्या टेस्ट किटमध्ये आरटी-पीसीआर चाचणीसारखेच अचूकता असणार आहे. मात्र या टेस्टचा रिपोर्ट येण्यास कमी वेळ लागणार आहे आणि खर्चही कमी लागणार आहे. तसेच हे किट वापरण्यासही सोपं असणार आहे.


Corona Vaccine Update | कोरोना व्हायरस लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी, Pfizer कंपनीचा दावा


वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) यापूर्वीच टाटाच्या टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. सप्टेंबरमध्ये सीएसआयआरने एका निवेदनात म्हटले आहे की, टाटा टेस्ट किटमध्ये  कोरोना व्हायरसच्या जीनोमची ओळख करण्यासाठी एका स्वदेशी रुपात विकसित, अत्याधुनिक CRISPR पद्धतीचा वापर केला गेला असल्याचं, CRISPR कडून सांगण्यात आलं आहे.


हे तंत्र सीएसआयआर-आयजीआयबीने (इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी) विकसित केले आहे. टाटा कंपनीने सांगितले की ही टेस्ट अचूक निकाल देण्यात पारंपारिक आरटी-पीसीआर टेस्ट एवढीच प्रभावी आहे. या व्यतिरिक्त, हे स्वस्त आहे आणि कमी वेळेत निकाल देते. ही पद्धत भविष्यात इतर साथीच्या आजारांच्या चाचणीमध्ये देखील वापरली जाऊ शकते.


संबंधित बातम्या