देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Weather Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता, 'या' राज्यांमध्येही अलर्ट जारी
Weather Update Today : येत्या काही दिवसात राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. पुढील पाच दिवसांत देशाच्या अनेक भागांत किमान तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 26 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर...
Mega Block : रविवार लोकल ट्रेनने प्रवास करताय? तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा
Mumbai Local Mega Block, 25 February : मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडण्याआधी रेल्वे प्रवासाचं नियोजन करून घ्या. रविवारी सकाळी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने तुमच्या लोकल प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने तुमच्या लोकल प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज, 25 फेब्रुवारीला मध्य रेल्वेकडून (Central Railway) तांत्रिक काम आणि दुरुस्तीसाठी (Repair and Track Maintenance) मुंबई लोकल रेल्वे (Mumbai Local Railway) मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर...
आंतरवाली सराटीत आज 'निर्णायक बैठक'; मनोज जरांगे म्हणाले आता शेवटचा निर्णय घेऊ
जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाचा आजचा 16 वा दिवस असून, मराठा समाजाची त्यांनी आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) आज 'निर्णायक बैठक' बोलावली आहे. आज 12 वाजता ते बैठकीला संबोधित करून पुढील दिशा ठरवतील. त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. सरकारकडून आपल्यावरती षडयंत्र रचल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही समाजविरोधी महत्वकांक्षी राक्षसांना उघड पडणार असल्याचे देखील ते म्हणाले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मनोज जरांगे काय बोलतील आणि कोणत्या निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. वाचा सविस्तर...
Farmers Protest : सिंघु आणि टिकरी बॉर्डर अंशत: सुरु करण्याचा दिल्ली पोलिसांचा निर्णय, नागरिकांना वाहतुकीपासून दिलासा
Delhi Singhu & Tikri Border : एफआरपीसह विविध मागण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं (Delhi Farmer Protest) आंदोलन सुरुच आहे. शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली'ची (Chalo Delhi) घोषणा करत दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सिंघु (Singhu Border) आणि टिकरी (Tikri Border) या सीमा बंद केल्या होत्या. रस्ता सुरु करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, आता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सिंघु आणि टिकरी बॉर्डर अंशत: सुरु करण्याचा दिल्ली निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर...
Horoscope Today 24 February 2024 : आजचा शनिवार खास! सर्व 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 24 February 2024 : आजचा दिवस, शनिवार, 24 फेब्रुवारी 2024, काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम घेऊन येऊ शकतो. 12 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...