Delhi Singhu & Tikri Border : एफआरपीसह विविध मागण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं (Delhi Farmer Protest) आंदोलन सुरुच आहे. शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली'ची (Chalo Delhi) घोषणा करत दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सिंघु (Singhu Border) आणि टिकरी (Tikri Border) या सीमा बंद केल्या होत्या. रस्ता सुरु करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, आता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सिंघु आणि टिकरी बॉर्डर अंशत: सुरु करण्याचा दिल्ली निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना वाहतुकीपासून दिलासा मिळाला आहे. शेतकरी आंदोलकांनी 29 फेब्रुवारीला होणारा "दिल्ली चलो मार्च" स्थगित केला आहे. यानंतर पोलिसांनी सिंघु आणि टिकरी बॉर्डर काही प्रमाणात खुली करत नागरिकांना दिलासा दिला आहे.


सिंघु आणि टिकरी बॉर्डर अंशत: सुरु


मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिकरी बॉर्डर आणि सिंघू बॉर्डरची प्रत्येकी एक सर्व्हिस लेन वाहनांच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी  दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली हरियाणाची सिंघू बॉर्डर बंद केली होती. शेतकऱ्यांचा दिल्ली चलो मोर्चा पुढे ढकलण्याच्या घोषणेनंतर दिल्ली पोलिसांनी सीमा अंशतः खुली करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अडवण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांनी या सीमेवर दुभाजक बसवले होते. याशिवाय दगड आणि सिमेंटचा भक्कम भिंतीही बांधण्यात आल्या होत्या. शनिवारी (24 फेब्रुवारी) पोलिसांनी जेसीबी मशीनच्या साह्याने हा अडथळा तोडून क्रेनच्या सहाय्याने दुभाजक हटवले. त्यामुळे हरियाणाहून राजधानीकडे जाण्याचा मार्ग अंशत: खुला झाला आहे.






'दिल्ली चलो मार्च' 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित


एमएसपीवर (MSP) कायदेशीर हमी मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. शनिवारी पंजाब-हरियाणाच्या खनौरी सीमेकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हिस्सार-नारनौंद रस्त्यावरील खेडी चोपटा गावातून शेतकरी सीमेकडे जात होते. वृत्तानुसार, थांबवल्यानंतर काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यावरून हाणामारी झाली. काही पोलीस कर्मचारी आणि शेतकरी जखमी झाले. काही शेतकऱ्यांना ताब्यातही घेण्यात आले. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो मार्च' 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला आहे. आंदोलनाची पुढील रणनीती 29 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते सर्वनसिंह पंढेर यांनी सांगितलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


New Criminal Laws : 18 वर्षांखालील मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि फाशीची शिक्षा, 1 जुलैपासून नवे फौजदारी कायदे