देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...  


राजधानी दिल्लीत टोमॅटोची 'लाली' वाढली, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत 200 रुपये 


सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. मागणी वाढून पुरवठा कमी झाल्यामुळं दरात मोठी वाढ होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) सध्या टोमॅटोची 'लाली' अधिक वाढल्याचं चित्र दिसत आहे. प्रतिकिलो टोमॅटोसाठी 200 रुपये द्यावे लागत आहेत. (वाचा सविस्तर) 


 'मुंबई- गोवा महामार्गाच्या कामावर पुस्तक लिहिता येईल', राज्यसभेत मंत्री नितीन गडकरी यांची मिश्किल टिप्पणी 


 देशातील रस्त्यांच्या रखडणाऱ्या कामावर केंद्रीय रस्ते वाहतून मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज्यसभेत (Rajyasabha) खंत व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी मुंबई - गोवा महामर्गाच्या (Mumbai - Goa Highaway) रखडलेल्या कामावर पुस्तक लिहिता येईल असं म्हणत गडकरी यांनी या महामर्गाच्या कामावर भाष्य केलं आहे. (वाचा सविस्तर)


 'या' दिवशी होणार अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, ट्रस्टने मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ


अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितल्याची माहिती आहे. पुढील वर्षी 16 ते 24 जानेवारी दरम्यान अयोध्येतील मंदिरातील गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.  (वाचा सविस्तर)


माफी मागितली नाही म्हणजे..., मोदी आडनावाची बदनामीप्रकरणी राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात जबाब नोंदवला


काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी  मानहानीच्या प्रकरणात सुरत कोर्टात (Gujarat High Court) लेखी स्वरुपात आपला जबाब नोंदवला. मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल असलेली मानहानीच्या याचिकेवर शुक्रवारी (4 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात आपला लेखी जबाब नोंदवला आहे. (वाचा सविस्तर)


हवामान बदलाचा भारतीय उपखंडावर परिणाम, भयंकर चक्रीवादळासह तापमानातही मोठी वाढ  


हवामान बदलाचा (Climate change) जगातील सर्वच देशांना फटका बसत आहे. भारतीय उपखंडावर देखील हवामान बदलाचा परिणाम झाला आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 'भारतीय भूप्रदेशात झालेल्या हवामान बदलाचे मूल्यमापन' हा अहवाल प्रसिध्द केला आहे. यामध्ये भारतीय उपखंडावर झालेल्या हवामान बदलाच्या परिणामाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आलं आहे. (वाचा सविस्तर)


 ट्विटरच्या 'X' नंतर पुन्हा मोठा बदल; आता 'Retweet' ऐवजी 'Repost' येणार 


टेस्ला (Tesla), स्पेसएक्स (Space X) आणि ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अलीकडेच ट्विटरचे नाव बदलून एक्स (X) केले आहे. अनेक यूजर्स ट्विटरच्या ब्लू बर्डला खूप मिस करत आहेत. दरम्यान, आता कंपनीने आणखी एक मोठा बदल जाहीर केला आहे. (वाचा सविस्तर)


क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती, इतिहासात आज  


आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे तीन ऑगस्ट रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी 1900 मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म झाला होता.  (वाचा सविस्तर)


 मेष, कर्क, मीनसह 'या' राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य 


 आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. मकर राशीच्या लोकांनी निराशेवर मात करणं गरजेचं आहे. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.  (वाचा सविस्तर)