Nitin Gadkari : देशातील रस्त्यांच्या रखडणाऱ्या कामावर केंद्रीय रस्ते वाहतून मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज्यसभेत (Rajyasabha) खंत व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी मुंबई - गोवा महामर्गाच्या (Mumbai - Goa Highaway) रखडलेल्या कामावर पुस्तक लिहिता येईल असं म्हणत गडकरी यांनी या महामर्गाच्या कामावर भाष्य केलं आहे. तर यावर प्रत्येक राजकीय पक्ष नापास होत असून हे काम काही केल्या पूर्ण होत नसल्याचं देखील गडकरी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा आणि  सिधी-सिंगरौली या दोन महामार्गांच्या रखडलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित केला आहे. 


हे अत्यंत दुर्दैवी - नितीन गडकरी


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची स्तुती राज्यसभेत करण्यात आली आहे. तर या महामर्गाच्या रखडलेल्या कामांबद्दल हतबलता देखील व्यक्त करण्यात आली आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, हे अत्यंत दुर्दैवी असून माझ्याकडे यावर भाष्य करण्यासारखं काही नाही. पण सिधी-सिंगरौली महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत  99 टक्के पूर्ण होणार असल्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिलं आहे. 


राज्यसभेत नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा


राज्यसभेतील प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान नितीन गडकरी यांच्या कामाची प्रशंसा करण्यात आली आहे. त्यांच्या कामाचे कौतुक भाजप खासदार अजय प्रताप यांनी केले आहे. तर संपूर्ण देशात नितीन गडकरी याच्या कामाची ख्याती असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. तर यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी देखील भाष्य करत गडकरींच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटंल की, केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही गडकरींच्या कामाची प्रशंसा होत असते. 


देशातील मुंबई - गोवा आणि  सिधी-सिंगरौली या दोन महामार्गांची कामे अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. यामुळे नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत देखील गडकरींनी राज्यसभेत बोलून दाखवली आहे. भाजप खासदार अजय प्रताप यांनी  सिधी-सिंगरौली या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचं म्हटलं. यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी अपराधीपणाची भावना व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी या महामर्गांचे काम का आणि कसे रखडले याचे स्पष्टीकरण देखील राज्यसभेत दिले आहे. तसेच या महार्मागाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं आहे. 


मुंबई - गोवा महामर्गाच्या रखडलेल्या कामावर सातत्याने टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता तरी या महामर्गाचे काम पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Lok Sabha Elections: 2019 च्या तुलनेत आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जींच्या TMC ला मोठा फायदा; भाजप, काँग्रेसच्या वाट्याला किती जागा?