देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Karnataka: कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरला? 'या' नेत्यामागे दुप्पट आमदार असल्याची सूत्रांची माहिती, आजच होणार घोषणा... 


Karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय नोंदवून भाजपला सत्तेतून हद्दपार केले असले तरी मुख्यमंत्री पदाबाबत पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धारमय्या आणि डीके शिवकुमार यांची नावं चर्चेत असून अजून अंतिम निर्णय झालेला नाही. सिद्धारमय्या यांना डीके शिवकुमार यांच्यापेक्षा दुप्पट आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे पारडं जड असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. वाचा सविस्तर 


Karnataka Election Result 2023: "कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये कारण..."; राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला


Karnataka Election Result 2023: राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी कर्नाटकातील (Karnataka) विजयाबाबत काँग्रेसला (Congress) सल्ला दिला आहे. ते सोमवारी (15 मे) म्हणाले की, कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये कारण 2013 मध्येही कर्नाटक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचा पराभव झाला होता. वाचा सविस्तर 


Weather Updates: कुठे उष्णतेची लाट, तर कुठे पावसाची शक्यता, महाराष्ट्रातही पारा वाढला; जाणून घ्या देशातील परिस्थिती


Weather Today Updates: गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात सतत कडक ऊन पडतंय. राष्ट्रीय राजधानीसह देशातील अनेक राज्यांमध्ये सकाळपासून रात्री उष्ण वाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणीही वाढत आहेत. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील अनेक भागांत तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. तसेच, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर 


'आंख से दूर सही दिल से कहां जाएगा...', न्यायमूर्ती शाहांच्या निरोप समारंभात सरन्यायाधीशांचा शायराना अंदाज


MR Shah Retirement: देशाचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांनी सोमवारी (15 मे) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून निवृत्त न्यायमूर्ती एमआर शाह यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमाक सरन्यायाधीशांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती एमआर शाह यांना 'टायगर शाह' असं संबोधलं. तसेच, न्यायमूर्ती शाहांचं कौतुक करताना ते म्हणाले की, 'व्यावहारिक ज्ञान आणि उत्कृष्ट सल्ले' यांमुळं शहांची कॉलेजियमला निर्णय घेण्यात ​​खूप मदत झाली. वाचा सविस्तर 


Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरांत आज कोणताही बदल नाही, एक लिटरसाठी तुम्ही किती रुपये मोजाल?


Petrol Diesel Price on 16th May 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 0.44 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 71.41 डॉलरवर व्यापार करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईल 0.04 टक्क्यांनी वाढून 75.56 टक्क्यांवर व्यापार करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ होत आहे. वाचा सविस्तर


Windfall Tax: केंद्र सरकारकडून दिलासा; पेट्रोलियम क्रूड स्वस्त, विंडफॉल टॅक्स केलाय रद्द


Windfall Tax: तेल वितरण कंपन्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारनं पेट्रोलियम क्रूड स्वस्त केलं आहे. त्याची किंमत 4100 रुपये प्रति टनवरून शून्यावर आणली आहे. अशाप्रकारे क्रूडवरील विंडफॉल टॅक्स रद्द करण्यात आला असून आजपासून ही सवलत लागू झाली आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, ही माहिती मिळाली आहे. सरकारनं गेल्या वर्षी जुलैमध्ये पहिल्यांदा हा विंडफॉल टॅक्स लागू केला होता आणि तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे. वाचा सविस्तर 


16th May In History: पुरंदरच्या युद्धात मुरारबाजी यांना वीरमरण, अमेरिकेच्या नाकावर टिच्चून सिक्कीमचे भारतात विलिनीकरण; आज इतिहासात


16th May In History: भारताच्या इतिहासाच्यादृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी पुरंदरच्या किल्ल्यावर मुघल सैन्याशी दोन हात करताना मुरारबाजी यांना वीरमरण आले. तर, स्वातंत्र्योत्तर काळात अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या नाकावर टिच्चून भारताने सिक्कीम राज्याचे विलिनीकरण केले. सांस्कृतिक क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिन आहे. तर, साहित्यातले 'फौजदार' अशी ओळख असलेले साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचे निधन झाले. वाचा सविस्तर 


Horoscope Today 16 May 2023: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या 12 राशींच आजच राशीभविष्य 


Horoscope Today 16 May 2023: आज मंगळवारचा दिवस काही राशींसाठी महत्त्वाचा दिवस आहे. मेष राशीच्या लोकांना आज खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तर धनु राशीच्या लोकांना आज नोकरीत प्रगती मिळेल. तसेच मीन राशीच्या लोकांच्या घरात उत्साहाचे वातावरण राहिल. जाणून घेऊया आजचे राशीभविष्य. वाचा सविस्तर