देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
मुळशी पॅटर्न 2.0 : 20 वर्षांचा बकासूर, दोस्तीत कुस्ती करणारा मुन्ना पोळेकर कोण? शरद मोहोळच्या हत्येमागची INSIDE STORY
पुणे : पुण्यातील (Pune Crime) कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची (Sharad Mohol murder case) दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली. खांद्याला खांदा लावून पुण्यात दहशत पसरवणारे, कायम सावलीसारखे सोबत असणारे साथीदारच, शरद मोहोळसाठी काळ बनून आले आणि त्याचा खात्मा करून गेले. मुन्ना पोळेकर असं या साथीदाराचं नाव आहे. पण त्याने इतर साथीदारांसोबत या हत्तेचा कट का रचला? दोस्तीत कुस्ती का आली? हा आरोपी कोण आहे मुन्ना पोळेकर कोण? हे जाणून घेऊयात... वाचा सविस्तर
Weather Update : पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता, अनेक राज्यांना अलर्ट जारी
IMD Weather Update Today : आज देशात विविध ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, दक्षिण भारतात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात तमिळनाडू किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता आहे... वाचा सविस्तर
Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! कोकण, विदर्भासह अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता; बळीराजाची चिंता वाढली
Maharashtra Weather Update Today : देशासह राज्याच्या हवामानातही (IMD Weather Forecast) पुन्हा बदल झाला आहे. पुढील 24 तास राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता (Rain Update) असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट (Unseasonal Rain) आल्याने बळीराजा मात्र चिंतेत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठावाड्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कोकणासह उत्तर महाराष्ट्रात सोमवारी जोरदार पाऊस झाला आहे, यामुळे तापमानातही घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात बहुतेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे... वाचा सविस्तर
Unseasonal Rain : कोकणाला पावसानं झोडपलं! आजही मुसळधार पावसाचा अंदाज; आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता
Sindhudurg, Ratnagiri Rain News : राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात अवकाळी पाऊस सुरु आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी दिसून येत आहे... वाचा सविस्तर
ट्रॅक्टरसह लाखो शेतकरी उतरले रस्त्यावर; 'या' देशात बळीराजानं छेडलंय मोठं आंदोलन
German Farmers Protest: मुंबई : देशात शेतकऱ्यांनी (Farmers Protest) पुन्हा एकदा आंदोलनाची हात दिली आहे. तर तिकडे जर्मनीतही शेतकऱ्यांनी मोठा लढा पुकारला आहे. जर्मनीतील शेतकरी सरकारविरोधात एकवटले असून ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी संपूर्ण देशभरात आंदोलनं छेडलं आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनपासून अनेक मोठ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांनी रस्ते अडवले आहेत. ट्रॅक्टरमधून आणलेलं खत रस्त्यावर पांगवून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. वाचा सविस्तर
फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांचा राजीनामा; नेमकं कारण काय?
Elisabeth Borne: नवी दिल्ली : फ्रान्सच्या (France) पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न (PM Elisabeth Borne) यांनी सोमवारी (8th January 2024) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे पंतप्रधान एलिझाबेथ यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे... वाचा सविस्तर
9th January In History: महात्मा गांधी अफ्रिकेतून भारतात परतले, स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला; आज इतिहासात
मुंबई : परदेशात राहणाऱ्या भारतीयांचे देशाच्या विकासात असलेले योगदान अधोरेखित करण्यासाठी 9 जानेवारीला 'प्रवासी भारतीय दिवस' (Pravasi Bharatiya Divas) साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1915 साली महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आफ्रिकेतून भारतात परत आले होते. तसेच स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.आजच्या दिवसात इतिहासात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात... वाचा सविस्तर
Horoscope Today 9 January 2024 : आजचा मंगळवार खास! सर्व 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 9 January 2024 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 9 जानेवारी 2024 मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, कुंभ राशीचे लोक आज आपले उद्दिष्ट साध्य करू शकतील, परंतु त्यांना खूप कष्ट करावे लागतील. आज मेष राशीच्या लोक आज खूप आत्मविश्वासी असतील. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया... वाचा सविस्तर